शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
3
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
5
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
6
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
7
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
8
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
9
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
10
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
11
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
12
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
13
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
14
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
15
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
16
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
17
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
18
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
19
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
20
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
Daily Top 2Weekly Top 5

अन् वाहनधारकांची उडाली धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2015 01:19 IST

रस्त्यांवरील वाहनांवर धडक कारवाई; २९ वाहने उचलली, किरकोळ वाद.

वाशिम : शहरातील रस्त्यावर वाटेल तेथे वाहने उभी करून तासन्तास गायब होणार्‍या वाहनाधारकांमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पोलीस विभागाच्यावतीने याची दखल घेत रस्त्यांवरील वाहनांवर धडक कारवाई मोहीम २२ सप्टेंबरपासून हाती घेण्यात आली. पहिल्याच दिवशी रस्त्यावर उभे असलेल्या २९ वाहने उचलून नेण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी वाहनारकांची मात्र एकच धांदल उडाली होती. पोलीस विभागाच्यावतिने परिवीक्षाधिन उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कांबळे व शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक राहुल जगदाळे यांनी शहरातील रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहने उचलून ट्रकमध्ये भरुन ठाण्यात जमा केली. शहरातील सर्वात गजबजलेला चौक म्हणून पाटणी चौक. या चौकात नेहमीच वर्दळ राहते. या रस्त्यावर फेरीवाल्यांसह काही दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने खरेदीसाठी येणार्‍या नागरिकांना आपली वाहने रस्त्यावर लावण्यसाशिवाय पर्याय नाही. पे अँन्ड पार्कीगची व्यवस्था असतानासुद्धा वाहनधारक तिकडे न जाता रस्त्यावर वाहने उभी करीत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत होता. पोलीस विभागाच्यावतिने याबाबत धडक मोहीम राबवून रस्त्यावर उभी असलेली वाहने जप्त करण्यात आली. वाहनधारक वाहन उभे करुन निघून गेला परत आल्यानंतर आपले वाहन न दिसल्याने त्याची चांगलीच धांदल उडाली. आजुबाजुला चौकशी केल्यानंतर आपले वाहन वाहतूक शाखेच्यावतिने उचलून नेण्यात आल्यानंतर पायदळ जावून दंड भरुन वाहने सोडविण्यात आलीत. २२ सप्टेंबर रोजी एकूण २९ वाहनांवर कारवाई करुन ३६00 रुपये दंड वसूल करण्यात आला. २४ सप्टेंबर रोजी सुध्दा बहुतांश वाहनांवर कारवाई करण्यात आली असून सदर मोहीम अविरत सुरु राहणार असल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्याचे चिन्ह दिसून येत आहे.