शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

आधीच सिलिंडर हजाराच्या घरात; घरपोचसाठी वेगळी लूट कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:42 IST

गॅस वितरकांना शहरी भागात १५ किलोमीटर तसेच ग्रामीण भागात ३० किलोमीटरपर्यंत विनामूल्य घरपोच सेवा देणे अपेक्षित आहे. तथापि, ...

गॅस वितरकांना शहरी भागात १५ किलोमीटर तसेच ग्रामीण भागात ३० किलोमीटरपर्यंत विनामूल्य घरपोच सेवा देणे अपेक्षित आहे. तथापि, गॅॅस वितरकांकडून घरपोच सिलिंडर पोहाेचविणाऱ्या डिलिव्हरी बाॅयचे वेगळे शुल्क वसूल करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. गेल्या दोन वर्षांत केंद्र शासनाच्या उज्ज्वला योजनाअंतर्गत अनेक गरीब व गरजू नागरिकांना एलपीजी गॅस जोडण्या देण्यात आल्या. यापैकी अनेक उज्ज्वला लाभार्थी दुर्गम भागांत राहात असल्याने त्यांना स्वत: वितरकाकडून येऊन फेरभरणी केलेली जोडणी घेऊन जावे लागत असते. मात्र रोख रक्कम पद्धतीने एलपीजी सिलिंडर विकत घेताना काही ठिकाणी त्याच्या देयकांमधील वितरण शुल्क कमी करण्यात येत नसल्याच्या तक्रारीदेखील पुढे येत आहेत.

००००००००००००

वितरक काय म्हणतात?

कोट: काही ग्राहकांना त्यापूर्वी नव्याने भरलेला सिलिंडर हवा असल्यास असे ग्राहक वितरण केंद्रावर रोख रक्कम देऊन स्वत: सिलिंडरची वाहतूक करतात. अशा पद्धतीने वितरकाकडून स्वत: सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ग्राहकांच्या देयकातून २० रुपये इतके वितरण शुल्क वगळण्यात येते.

- आशिष हुरकट

गॅस वितरक, तथा जिल्हाध्यक्ष एसबीसी असोसिएशन,

००००००००००००००००

कोट: शासनाने निर्धारित केलेल्या दरातच ग्राहकांना सिलिंडर दिले जाते. वितरकांकडून घरपोच डिलिव्हरीसाठी अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे डिलिव्हरी बॉयच्या २० रुपये शुल्काची पावती देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. डिलिव्हरी बॉय अतिरिक्त शुल्क आकारत असेल, तर ग्राहकाने तक्रार करावी.

-मिलिंद सोनोने

गॅस वितरक, तथा सचिव एसबीसी असोसिएशन,

डिलिव्हरी बॉयला वेगळे २० रुपये कशासाठी?

कोट: गॅसच्या किमती एकीकडे हजाराच्या घरात गेल्या असताना घरपोच डिलिव्हरीसाठी अतिरिक्त २० रुपये घेतले जातात. याची कुठलीही पावती दिली जात नाही. हे अतिरिक्त पैसे घेणे योग्य आहे कय, याची प्रशासनाने दखल घ्यावी.

- सारिका पवार,

गृहिणी

----------

कोट: शासनाने स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात वितरण शुल्काचा अंतर्भाव केला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून मात्र गॅस वितरक घरपोच डिलिव्हरीसाठी अतिरिक्त २० रुपये शुल्क आकारते. याची चौकशी का केली जात नाही, असा आमचा प्रश्न आहे.

-शालिनी ठोक,

गृहिणी

००००००००००००

२) वर्षभरात ३०० रुपयांची वाढ (बॉक्स)

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात गेल्या वर्षभरात ३०० रुपयांची वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी गॅस सिलिंडरचे दर ६१४ रुपयांपर्यंत होते; परंतु मागील काही महिन्यांत गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वर्षभरातच सिलिंडरचे दर ९०५ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्याची झळ ग्राहकांना सोसावी लागत आहे.

१) सध्याचा गॅस सिलिंडर दर - ९०५ रुपये

शहरातील एकूण ग्राहक - ४७,२८०