शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम वऱ्हाडात वार्षिक सरासरीच्या ८८ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 13:55 IST

वाशिम: जुनच्या सुरुवातीपासूनच धडाक्यात आगमन करणाऱ्या मान्सूनने जुलै आणि सप्टेंबरमध्ये चांगलाच खंड दिला आणि परतीच्या पावसानंतरही यंदा पश्चिम वऱ्हाडात पावसाची वार्षिक सरासरी १०० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जुनच्या सुरुवातीपासूनच धडाक्यात आगमन करणाऱ्या मान्सूनने जुलै आणि सप्टेंबरमध्ये चांगलाच खंड दिला आणि परतीच्या पावसानंतरही यंदा पश्चिम वऱ्हाडात पावसाची वार्षिक सरासरी १०० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकली नाही. २८ सप्टेंबरपर्यंत वार्षिक सरासरीच्या ८८ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. कमी पाऊस झाल्याने पश्चिम वऱ्हाडात पाणीटंचाईची समस्या जाणवण्याची भिती वर्तविली जात आहे.पश्चिम वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यात गत काही वर्षांत पावसाची सरासरी ही कमीच राहिली आहे. यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर जुलैच्या मध्यंतरापर्यंत अधूनमधून चांगलाच पाऊस पडला. त्यामुळे यंदा या तिन्ही जिल्ह्यात पाऊस वार्षिक सरासरी गाठण्याची शक्यता निर्माण झाली; परंतु जुलैच्या मध्यंतरानंतर पावसाने खंड दिला, तर आॅगस्टच्या मध्यंतरी जोरदार हजेरी लावली. त्यानंतर मात्र पावसाने पुन्हा विश्रांती घेतल्याने वार्षिक सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी दिसू लागले. परतीच्या पावसाने पश्चिम वºहाडात हजेरी लावल्यानंतर अकोला जिल्ह्यात पावसाने कशीबशी वार्षिक सरासरी गाठली. या जिल्ह्यात २८ सप्टेंबरपर्यंत १००.६२ टक्के पाऊस पडला. तर वाशिम जिल्ह्यात ९६ टक्के पावसाची नोंद झाली; परंतु बुलडाणा जिल्ह्यात केवळ ६९.६९ टक्केच पावसाची नोंद झालेली आहे. या तिन्ही जिल्ह्यांची एकंदरीत सरासरी काढल्यास २८ सप्टेंबरपर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ८८ टक्के पाऊस पडल्याचे स्पष्ट होत आहे.आठ तालुक्यांची स्थिती गंभीरपश्चिम वऱ्हाडात २८ सप्टेंबरपर्यंत पावसाची सरासरी ८८ टक्के असली तरी, ८ तालुक्यात ७५ टक्केही पाऊस पडलेला नाही. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील तेल्हारा (६३. ८१) टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव (४९.६३), नांदुरा (५३.६२), शेगाव (६२.५४), देऊळगाव राजा (६३.८७), संग्रामपूर (६६.८५), चिखली (७०.११) आणि मोताळा (७३.०९) या तालुक्यांचा समावेश आहे. पावसाची सरासरी लक्षात घेता पुढील वर्षीच्या उन्हाळ्यात या आठही तालुक्यात पाणीटंचाईची समस्या तीव्र होणार असल्याचे संकेत आहेत.

टॅग्स :washimवाशिमAkolaअकोलाbuldhanaबुलडाणाmonsoon 2018मान्सून 2018