शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

७० वर्षीय शाहीर करतोय पोवाड्यातून मतदान जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 15:29 IST

७० वर्षाच्या वयात शाहीर पवार यांनी बाळगलेली ही जीद्द हटकेच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वयाची सत्तरी ओलांडल्याने सर्वांगावर पडलेल्या सुरकुत्या, दुरचे दिसत नसल्याने डोळ्यावर लागलेला मोठ्या भिंगाचा चष्मा, अशाही अवस्थेत काळवंडलेल्या चेहऱ्यावर कुठलाच थकवा न दिसू देता ते पोवाड्यातून आजही पूर्ण दिमतीने सामाजिक विषयांवर समाज प्रबोधन करित आहेत. हल्ली विधानसभा निवडणूकीच्या काळात त्यांनी गावोगावी भेटी देऊन मतदान जनजागृतीचे कार्य हाती घेतल्याचे दिसून येत आहे.वाशिम तालुक्यातील कार्ली या गावचे रहिवासी असलेले ७० वर्षीय अंबादास पवार यांना संपूर्ण वाशिम जिल्हा ओळखतो, तो त्यांच्यातील पोवाड्यातून समाज प्रबोधनाच्या अलौकीक गुणामुळे. उन्हाळा आला की तापमानापासून बचावासाठी नागरिकांनी कुठल्या उपाययोजना करायला हव्या, पावसाळ्यात साथीच्या आजारांपासून स्वत:चा बचाव कसा करावा, स्वच्छता बाळगणे किती महत्वाचे आहे, हिवाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यायची, यासारख्या ज्वलंत सामाजिक विषयांवर अंबादास पवार दरवर्षी जिल्हाभर फिरून जनजागृती करतात. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद यासह लोकसभा, विधानसभा निवडणूकीदरम्यान नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने घराबाहेर पडून मतांचा हक्क बजवावा, असे आवाहन पोवाड्यातून करण्यासोबतच निवडणूक प्रक्रियेत मतांच्या महत्वाबाबत ते प्रबोधन करतात. सद्याही त्यांनी हे कार्य अवलंबिले असून कार्ली या आपल्या गावी ते केवळ झोपण्यासाठी आणि जेवणासाठी घरी जातात. उर्वरित संपूर्ण वेळ ते समाज प्रबोधनासाठीच खर्च करित असल्याचे गावकरीही मोठ्या अभिमानाने सांगतात. ७० वर्षाच्या वयात शाहीर पवार यांनी बाळगलेली ही जीद्द हटकेच आहे.

टॅग्स :washimवाशिम