शौचालयासाठी पाच हजारांचा अतिरिक्त निधी!

By Admin | Updated: December 18, 2015 02:33 IST2015-12-18T02:33:13+5:302015-12-18T02:33:13+5:30

३0२ लाभार्थ्यांंना अनुदान वाटप.

5 thousand additional funds for the toilet! | शौचालयासाठी पाच हजारांचा अतिरिक्त निधी!

शौचालयासाठी पाच हजारांचा अतिरिक्त निधी!

शीतल धांडे / रिसोड : स्वच्छ भारत अभियानांतर्गत शासनाकडून शौचालय उभारण्याकरिता लाभार्थ्यांंना मिळणारा १२ हजार रुपयांचा निधी मुळातच कमी पडत असल्याची बाब लक्षात घेऊन स्थानिक नगर परिषदेने लाभार्थ्यांंना अतिरिक्त पाच हजार रुपयांचे अनुदान देण्याचा ठराव पारित केला. त्यानुसार, आतापर्यंंत ३0२ लाभार्थ्यांंना २५ लाख ६७ हजार रुपये अनुदानदेखील वितरित करण्यात आले आहे.
नगर परिषदेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, सध्या २ हजार २५४ नागरिकांकडे वैयक्तिक शौचालय नसल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, शहरी भागात शौचालय उभारण्याकरिता केंद्र व राज्य शासनाकडून सहा हजार याप्रमाणे १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते; मात्र एवढय़ा कमी पैशात शौचालयाचे बांधकाम पूर्ण होत नसल्याने योजनेत सहभागी होणार्‍या लाभार्थ्यांंंमध्ये निरुत्साह होता. ही बाब लक्षात घेऊन जिल्हय़ातील चारही नगर परिषदांनी सर्वसाधारण फंडातून लाभार्थ्यांंना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे निर्देश शासनस्तरावरून देण्यात आले. त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून, चारही नगर परिषदांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील वैयक्तिक शौचालय नसणार्‍या लाभार्थ्यांंंच्या याद्या तयार केल्या आहेत. अर्जानुसार लाभार्थ्यांंंना प्रोत्साहनपर अनुदान देण्यासही प्रारंभ करण्यात आला आहे. या प्रक्रियेत सध्या तरी रिसोड नगर परिषद अग्रक्रमावर असल्याचे दिसून येत आहे. रिसोड पालिकेने १ हजार ८११ लाभार्थ्यांंंचे अर्ज ह्यऑनलाइन अपलोडह्ण केले असून, त्यापैकी ३५0 लाभार्थ्यांंंचे ह्यस्पॉट व्हेरीफिकेशनह्णची प्रक्रिया पार पडली आहे. यातील ४८ लाभार्थ्यांंंच्या बाबतीत किरकोळ त्रुटी आढळल्या असून, उर्वरित ३0२ लाभार्थ्यांंंना विनाविलंब एकंदरित अनुदानाच्या ५0 टक्के अर्थात ८ हजार ५00 रुपये याप्रमाणे २५ लाख ६७ हजार रुपयांच्या पहिल्या हप्त्याची रक्कम लाभार्थ्यांंंच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. यामुळे सध्या रिसोड शहरात १0 शौचालयांचे काम पूर्ण झाले असून, इतर ठिकाणी शौचालय उभारणीच्या कामाने वेग घेतल्याचे दिसून येत आहे.

Web Title: 5 thousand additional funds for the toilet!