१६ जणांची कोरोनावर मात; ८ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:45 IST2021-07-14T04:45:45+5:302021-07-14T04:45:45+5:30

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले ...

16 beat Corona; 8 Positive | १६ जणांची कोरोनावर मात; ८ पॉझिटिव्ह

१६ जणांची कोरोनावर मात; ८ पॉझिटिव्ह

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे चित्र आहे. सोमवारी नव्याने ८ रुग्ण आढळून आले, तर १६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. वाशिम, मंगरूळपीर व मानोरा तालु्क्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत ४१५७७ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०८४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर आतापर्यंत ६२२ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली, तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.

००००

१०९ सक्रिय रुग्ण

सोमवारच्या अहवालानुसार नव्याने ८ रुग्ण आढळून आले, तर १६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण १०९ रुग्ण सक्रिय आहेत.

00000000

वाशिम तालुका निरंक

सोमवारच्या अहवालानुसार वाशिम शहरासह तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरात सलग तिसऱ्यादिवशी एकही रुग्ण आढळून न आल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला. मंगरूळपीर व मानोरा शहरात एकही रुग्ण आढळून आला नाही. मालेगाव शहरात दोन, तर ग्रामीण भागात एक, रिसोड शहरात तीन, कारंजाच्या ग्रामीण भागात दोन रुग्ण आढळले.

Web Title: 16 beat Corona; 8 Positive