शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

११ गावांनी नाकारला बंदोबस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:21 IST

वाशिम: गावागावांमध्ये साजरे होणारे सणोत्सव शांततेत पार पडावे, यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. मात्र, बहुतांश समित्या कागदोपत्रीच कार्यान्वित असून, आजही पोलीस बंदोबस्ताविना सण-उत्सव साजरे होऊ शकत नसल्याची बाब अधोरेखित होत आहे. तथापि, जिल्ह्यात ७९१ गावे आहेत. त्या तुलनेत केवळ ११ गावांनी पोळा सणाला पोलीस बंदोबस्त नाकारल्याची माहिती सूत्रांनी रविवारी दिली.

ठळक मुद्देतंटामुक्त गाव समित्यांचा पुढाकारजिल्ह्यात ७९१ गावे

आज पोळा लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गावागावांमध्ये साजरे होणारे सणोत्सव शांततेत पार पडावे, यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. मात्र, बहुतांश समित्या कागदोपत्रीच कार्यान्वित असून, आजही पोलीस बंदोबस्ताविना सण-उत्सव साजरे होऊ शकत नसल्याची बाब अधोरेखित होत आहे. तथापि, जिल्ह्यात ७९१ गावे आहेत. त्या तुलनेत केवळ ११ गावांनी पोळा सणाला पोलीस बंदोबस्त नाकारल्याची माहिती सूत्रांनी रविवारी दिली.गावातील तंटे गावातच मिटविण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री स्व. आर.आर. पाटील यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला सुरूवात केली. जिल्ह्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये समित्यांचे गठण झालेले आहे. त्यानुसार, सणोत्सव शांततेत पार पाडण्याकरिता ‘एक गाव एक गणपती’, ‘एक गाव एक दुर्गादेवी’, पोलीस बंदोबस्ताविना पोळा, गुलाल आणि डीजे विरहित मिरवणूक, अशा संकल्पना समितीसमोर ठेवण्यात आल्या. त्यासाठी लोकसंख्येच्या  आधारावर लाखो रुपयांची बक्षिसे देखील दरवर्षी तंटामुक्त गाव समित्यांना दिले जातात. जिल्ह्यातील अनेक गावांनी तंटामुक्त गाव पुरस्कार प्राप्त केले; परंतु सामाजिक उपक्रम राबविण्यास तंटामुक्त गाव समित्या कमी पडत असून, जिल्ह्यातील केवळ ११ गावांनी पोळा सणाला बंदोबस्त नाकारल्यावरून ही बाब सिद्ध होत आहे. मानोरा तालुक्यातून कारखेडा गावाने पोळा सणाला पोलीस बंदोबस्त नाकारला आहे. यासाठी तेथील तंटामुक्तीचे अध्यक्ष धम्मदीप ढवळे, पोलीस पाटील वासुदेव सोनोने यांनी पुढाकार घेतला. वाशिम तालुक्यात कुंभारखेडा, मालेगाव तालुक्यात केळी आणि रिसोड तालुक्यातील आठ गावांचा पोलीस बंदोबस्त नाकारण्यात समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जनावरे आजारी; पिंपरीमध्ये यंदा भरणार नाही पोळा!पिंपरी अवगण (ता.मंगरूळपीर) येथे गेल्या आठ दिवसांपासून अज्ञात आजाराची लागण झाली असून, यात १0 जनावरे दगावली आहेत. दरम्यान, गावातील गुरांचे लसीकरण करण्यात आले; परंतु एकापेक्षा अधिक जनावरे जवळ आल्यास आजाराची लागण वाढू शकते, ही बाब लक्षात घेऊन गावातील पोळा यंदा रद्द ठेवण्याचा निर्णय गावकर्‍यांनी घेतला आहे.