शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

वाडा बनतोय राजकीय आखाडा

By admin | Updated: May 19, 2017 04:08 IST

नगरपंचायतीची घोषणा अलिकडेच नगर विकास विभागाने करून ग्रामपंचायत बरखास्त केली. त्यानंतर प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय

- लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : नगरपंचायतीची घोषणा अलिकडेच नगर विकास विभागाने करून ग्रामपंचायत बरखास्त केली. त्यानंतर प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय हालचाली सुरू झाल्या असून वाडा राजकीय आखाडा बनला आहे. वाडा नगरपंचायतीत लोकसंख्येप्रमाणे उमेदवारांची जातीनिहाय वर्गवारी झाली असून सर्वसाधारण सात जागा, मागास प्रवर्ग पाच जागा, अनुसूचित जमाती चार जागा व अनुसूचित जाती एक जागा अशा एकूण सतरा जागा असणार आहेत. सर्वसाधारण व मागास प्रवर्ग यांच्यासाठी बारा जागा असणार असल्याने आगामी नगरपंचायतीची राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. ५० टक्के आरक्षणाप्रमाणे एकूण नऊ जागा महिलांसाठी राखीव असल्याची माहिती तहसीलदार दिनेश कुऱ्हाडे यांनी दिली. ग्रामपंचायत असतांना सतरा सदस्यांपैकी नऊ सदस्य अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गाचे होते. मात्र आगामी नगरपंचायतीत ही संख्या पाच वर आली. त्यामुळे नगरसेवक पदाच्या बारा जागांसाठी चांगलीच चुरस निर्माण होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, वाडा ग्रामपंचायतींची शिवसेना, भाजप, कॉग्रेस आ िण राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी सत्ता उपभोगली आहे. मात्र गावाचा विकास आणि चेहरामोहरा बदलण्यास या चारही पक्षांना अपयश आले आहे. पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, बाजारपेठ, अतिक्र मण, वाहतूक कोंडी सार्वजनिक शौचालय आदी सुविधा जैसे थे आहेत. शहरात घाणीचे साम्राज्य नेहमीच असते. सर्व राजकीय पक्षांचे तालुक्यातील नेते वाडा गावातच राहात आहेत. असे असताना कोणत्याच सुविधा उपलब्ध नाहीत.- या निवडणुकीत भाजप व शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढविणार असून कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी व निलेश सांबरे यांची विक्र मगड विकास आघाडी हे एकत्र येऊन आपली मोट बांधणार असल्याची चर्चा सुरू आहे.