शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील लसीकरणाच्या कासवगतीने नाराजी, आजवर २ लाख ७३ हजार ३०२ नागरिकांनाच डोस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 08:38 IST

पालघर जिल्ह्याच्या अनेक भागांत अद्यापही लसीकरणाला म्हणावा तसा वेग आलेला नाही. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना दुसरीकडे लसीकरण वेळत होत नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

जगदीश भोवड -

पालघर :  जिल्ह्याची एकूण लोकसंख्या अंदाजे ३० लाखांच्या घरात आहे, मात्र आजवर जिल्ह्यात केवळ २ लाख ७३ हजार ३०२ एवढेच लसीकरण झालेले आहे. एकंदर कासवगतीने होत असलेले लसीकरण पाहता नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीची भावना पसरलेली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत असलेल्या लसीकरण केंद्रांवर नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसत असून अनेकांना लसीअभावी परत फिरावे लागत आहे.पालघर जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ग्रामीण भागातही रुग्ण आढळत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. पूर्वी गावखेड्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नव्हता. मात्र आता गावागावांमध्येही रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे सुरुवातीच्या काळात कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी फारसे उत्सुक नसलेले अनेक आता मात्र लसीकरण केंद्रांवर गर्दी करताना दिसत आहेत. पालघर जिल्ह्याच्या अनेक भागांत अद्यापही लसीकरणाला म्हणावा तसा वेग आलेला नाही. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना दुसरीकडे लसीकरण वेळत होत नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दुसरीकडे लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करताना कुणीही कुठेही जाऊन लस घेऊ शकतो, अशी सोय असल्यामुळे पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतील केंद्रांवर शहरी भागातील नागरिक लसीकरणासाठी येत असल्याचेही दिसून आले आहे. जव्हार, विक्रमगड, वाडा आदी तालुक्यांतील ग्रामीण भागांतील लसीकरण केंद्रांवर बाहेरील लोकांनीच गर्दी केल्याचे दिसून आल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचेही पाहावयास मिळाले.

१८ वर्षांपुढील नागरिकांमुळे ज्येष्ठांचे दुसरे डोस रखडलेराज्यात १८ वर्षांपुढील नागरिकांना १ मे पासून लसीकरण सुरू करण्यात आल्यामुळे अनेक लसीकरण केंद्रांवर गर्दी होत आहे. यामुळे पहिला डोस घेतलेल्या ४५ वर्षांवरील अनेक नागरिकांना दुसरा डोस घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत. तसेच ग्रामीण भागातील अनेकांना मोबाईलवर रजिस्ट्रेशन करता येत नसल्याने तेही लसीकरण केंद्रांवर जाऊन गर्दी पाहून परत फिरत आहेत.

लसीअभावी काही सेंटर बंदजिल्ह्याच्या अनेक भागांतून लसीकरणाबाबत तक्रारी येत आहेत. तलासरीसह काही तालुक्यांमधील लसीकरण केंद्रांवर लसीचा साठा नसल्याने लसीकरण बंद करावे लागले आहे. तसेच अन्यही भागांत घडत आहे. त्यामुळे सकाळपासून केंद्रावर गर्दी करणाऱ्या नागरिकांना लस न मिळाल्याने परत फिरावे लागत आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. 

लसीकरण दहापासून, गर्दी पहाटेपासूनचकोरोनापासून बचाव व्हावा यासाठी लसीकरण अत्यंत आवश्यक असल्याने अनेक लोक पहाटेच  लसीकरण केंद्र गाठतात आणि लाईनमध्ये थांबतात. मात्र सरकारी कर्मचारी सकाळी नऊ-साडेनऊनंतर येत असल्याने प्रत्यक्षात लसीकरण सकाळी १० वाजल्यापासून सुरू होते. त्यामुळे नागरिकांना चार-पाच तास रांगेत उभे राहावे लागते.

मी कुडूस येथील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी सकाळच्या सुमारास गेलो होतो, परंतु तेथे प्रचंड गर्दी होऊन वादावादी झाली. शेवटी पोलिसांना बोलावले. त्यामुळे मला लस न घेताच रिकाम्या हाताने परत फिरावे लागले.-अनिल पाटील, कुडूस

वाड्यातील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गेलाे असता माझ्या मोबाईलवरील लिंग ओपन न झाल्याने मला लस मिळू शकली नाही. - शरद नगर, वाडा

वाडा शहरातील पांडुरंग जावजी हायस्कूलच्या लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी सकाळी  आणि दुपारी दोन वेळा गेली दोन्ही वेळा तुमच्या मोबाईलमधील लिंग ओपन होत नसल्याचे कारण पुढे करून मला दोन वेळा घरी परतावे लागले.- सोनू भोईर, गांधरे 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलVasai Virarवसई विरार