शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: नालासोपाऱ्यात वाहतूक पोलिसांना बाप-लेकाकडून जबर मारहाण; लायसन्सवरुन झाला वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 18:23 IST

नालासोपाऱ्यात वाहतूक पोलिसांना भररस्त्यात जबर मारहाण करण्यात आली आहे.

मंगेश कराळे

नालासोपारा: शहरात कायद्याचा धाकच उरलेला नाही का, असा गंभीर प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी सकाळी विजयनगर परिसरातील सितारा बेकरीजवळ दोन वाहतूक पोलिस हवालदारांना एका बाप-लेकाने भरदिवसा आणि भररस्त्यावर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मारहाण करणाऱ्यांची नावे मंगेश नारकर आणि त्यांचा मुलगा पार्थ नारकर अशी आहेत. या दोघांचा वाहतूक पोलिस कर्मचारी हनुमंत सांगळे आणि शेष नारायण आटरे यांच्यासोबत लायसन्स वरून काही वाद झाला. त्यानंतर या दोघांनी पोलिसांवर हल्ला केला.  दोघेही वाहतूक विभागात कार्यरत असून, ड्युटीवर असताना त्यांच्यावर ही मारहाण करण्यात आली आहे.

घटनेचं कारण समोर आलं आहे की, पार्थ नारकर याच्याकडे गाडी चालवताना लायसन्स नसल्याचं आढळून आलं. पोलिसांनी लायसन्स विचारल्यावर त्याने वडिलांना घटनास्थळी बोलावलं. त्यानंतर पोलिस व बाप-लेकामध्ये वाद झाला आणि तो वाद थेट मारहाणीपर्यंत गेला. पोलिसांवर हात उचलणं ही अत्यंत गंभीर बाब असून, यावर वसई-विरारचे नवीन पोलिस आयुक्त काय कठोर पावले उचलतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांवरील वारंवार होणारे हल्ले ही चिंताजनक बाब असून, कायद्याचे रक्षण करणाऱ्यांनाच जर संरक्षण नसेल, तर सामान्य जनतेचा काय विश्वास राहणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

टॅग्स :VirarविरारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस