शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूतील साडेतीनशे अंगणवाड्या नळजोडणीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 23:45 IST

मुलांना शुद्ध पाणी मिळणे आवश्यक : उन्हाळ्यात होणार वणवण

अनिरुद्ध पाटील  लोकमत न्यूज नेटवर्क बोर्डी : मार्च महिना सुरू होत नाही तोच उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. आगामी तीन महिने  पाणीटंचाईचा प्रश्न अधिक भेडसावणार आहे. तालुक्यातील जवळपास साडेतीनशे अंगणवाडी केंद्रांना तर अद्याप नळजोडण्याच मिळालेल्या नसल्याने त्यांच्यावर येत्या उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येणार आहे. कोरोनामुळे प्रत्यक्ष बालके अंगणवाड्यांत येत नसली तरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता त्यांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळणे आवश्यक आहे. यानिमित्ताने पिण्याच्या पाण्यासाठी नळजोडणीचा मुद्दा चर्चेला आला आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत पाच वर्षांच्या आतील बालकांना बालशिक्षणाचे धडे अंगणवाडी केंद्रातून दिले जातात. त्यांचा सर्वांगीण विकास साधताना, सर्व सोयीसुविधा मिळणे आवश्यक आहे. केंद्राच्या इमारतीपासून आहार, पिण्याचे पाणी इ. मिळणे आवश्यक आहे. तालुक्यात डहाणू आणि कासा येथे दोन एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालये आहेत. त्याअंतर्गत मुख्य आणि मिनी अशा एकूण ४०८ अंगणवाड्या आहेत. सध्या अंगणवाडी केंद्रे सुरू असली, तरी लाभार्थी बालके प्रत्यक्ष केंद्रात येत नाहीत. आठवड्यातून एक दिवस लाभार्थ्यांच्या पालकांना केंद्रात बोलावून आठवड्याचा आहार दिला जातो. दरम्यान, तालुक्यातील बहुतेक अंगणवाडी केंद्रांत नळाद्वारे पाणीपुरवठ्याची सोय अद्याप झालेली नाही. ४०८ पैकी ५९ अंगणवाडी केंद्रांना नळ पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध आहे. ११५ केंद्रांत हातपंप, १६० ठिकाणी बोअरवेल, ६० केंद्रांवर विहिरीद्वारे पाणीपुरवठा होतो. तर आजही ५१ केंद्रांची भिस्त सार्वजनिक नळ पाणीपुरवठ्यावर आहे. यापैकी ३८ केंद्रांवर पाणी साठवण टाकी आहे. तर ३७० केंद्रांवर पाण्याची टाकीही नाही.

कुपोषणाचा प्रश्न आजही गंभीरडहाणू, मोखाडा, तलासरी, जव्हार या आदिवासीबहुल तालुक्यांत आजही कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. कुपोषणाच्या भस्मासुराला दूर पळवायचे असल्यास प्रत्येक अंगणवाडी केंद्रावर शुद्ध पाणीपुरवठा करणे हे शासनाचे कर्तव्य आहे.