त्यांनी दिला पित्याच्या पार्थिवाला अग्नी

By Admin | Updated: April 22, 2016 01:49 IST2016-04-22T01:49:12+5:302016-04-22T01:49:12+5:30

आपल्या आप्तस्वकियांसह आईवडीलांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या चितेला अग्नि देण्यासाठी महिलांना स्मशानभूमीत जाण्यास बंदी असताना पारंपारीक रितीरिवाज व रुढीना तिलांजली देऊन

They gave the fire of the father's body fire | त्यांनी दिला पित्याच्या पार्थिवाला अग्नी

त्यांनी दिला पित्याच्या पार्थिवाला अग्नी

पालघर : आपल्या आप्तस्वकियांसह आईवडीलांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या चितेला अग्नि देण्यासाठी महिलांना स्मशानभूमीत जाण्यास बंदी असताना पारंपारीक रितीरिवाज व रुढीना तिलांजली देऊन सातपाटी येथील तीन मुलींनी आपल्या मृत वडीलांच्या चितेला अग्नी दिला. मच्छिमार समाजानेही या नव्या प्रथेचा मोठ्या मनाने स्वीकार केला.
सातपाटी येथील मच्छीमार नंदकुमार आ. मेहेर यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. मच्छीमार समाजाने अंधश्रद्धा, हुंडापद्धतीला कधी स्थान दिले नव्हते. दिवसश्राद्ध पद्धतीत बदल, लग्न हळदी कार्यक्रमातील मटण-दारुची व्यवस्था इ. बाबत समाजातील संघटना नेहमीच पुढाकार घेऊन त्या प्रथा बंद करण्यासाठी पुढाकार घेत होत्या. (प्रतिनिधी)
मच्छीमार समाजाकडून पाठिंबा
बुधवारी मेहेर यांच्या मृत्यूनंतर समुद्रकिनाऱ्यावर त्यांच्या चितेला अग्नी देण्याच्या वेळेस कविता, गौरी आणि जुईली या तीन मुलींनी ते कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. कर्मठ रुढी, परंपराना फारसे महत्व न देणाऱ्या मच्छीमार समाजाने त्यांना अनुमती दिली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांनीही त्यास होकार दिला. त्यामुळे साश्रू नयनानी त्या तिन्ही मुलींनी आपल्या वडीलांच्या चितेला अग्नी दिला. सातपाटी गावामध्ये प्रथमच अशी घटना घडल्याने त्याची मोठी चर्चा सुरू होती. या घटनेचे पडसाद संपूर्ण मच्छिमार समाजात उमटत आहेत.

Web Title: They gave the fire of the father's body fire