शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

कलहामुळे रिपाइंची संधी गेली

By admin | Updated: April 24, 2016 02:05 IST

दोन गटातील वादामुळे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाची वसई विरार महानगरपालिकेत स्विकृत नगरसेवक मिळवण्याची संधी हुकली आहे. एका गटाने उमेदवारी अर्ज दाखल केला होता

- शशी करपे,  वसई

दोन गटातील वादामुळे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाची वसई विरार महानगरपालिकेत स्विकृत नगरसेवक मिळवण्याची संधी हुकली आहे. एका गटाने उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र बहुजन विकास आघाडीच्या गटनेत्याची शिफारस नसल्याने उमेदवारी अर्ज बाद झाला. बहुजन विकास आघाडीने विधानसभा आणि वसई विरार महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) शी युती केली होती. यावेळी आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी प्रचारातही भाग घेतला होता. त्यावेळी झालेल्या बैठकीत महानगरपालिका निवडणुकीत दोन जागा आणि एक स्विकृत नगरसेवकपद आरपीआयला देण्याचे ठरले होते. त्यानुसार पालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने माजी नगरसेवक पांडुरंग इंगळे आणि रेश्मा जाधव यांना उमेदवारी दिली होती. मात्र, हे दोन्ही नगरसेवक प्रत्यक्षात बहुजन विकास आघाडीचे पूर्वीचेच कार्यकर्ते असल्याने आरपीआयने आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याकडे तक्रारही केली होती. पण, स्विकृत नगरसेवक आणि इतर कमिट्यांमध्ये आरपीआय कार्यकर्त्यांना सामावून घेतले जाईल, असा शब्द दिला गेल्यानंतर आरपीआयचे समाधान झाले होते.स्विकृत नगरसेवकपद मिळावे यासाठी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष ईश्वर धुळे आणि एस. एस. कांबळे यांच्यात चुरस होती. दोन्ही गटातील पदाधिकारी त्यासाठी आमदार ठाकूर यांच्याकडे पाठपुरावा करीत होते. खासदार आठवले यांनी आमदार ठाकूर यांची भेट घेऊन धुळे यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानंतरही कांबळे गटाने ठाकूरांकडे तगादा लावून स्विकृत नगरसेवकपदाचा वाद भिजत ठेवला होता. आरपीआयमध्ये एकमत होत नसल्याने स्विकृत नगरसेवक पदासाठी आघाडीने अजीव पाटील, प्रफुल्ल साने, इक्बाल हुद्दा, डॉ. प्रवीण क्षिरसागर आणि संतोष वळवईकर यांच्या नावाची शिफारस केली होती. त्याचवेळी ईश्वर धुळे यांनीही अर्ज दाखल केला होता. मात्र, आघाडीच्या गटनेत्याची शिफारस नसल्याने धुळे यांचा अर्ज बाद होऊन आघाडीचे पाचही सदस्य बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे स्विकृत नगरसेवकपद मिळवण्याची आरपीआयची संधी सध्यातरी हुकली आहे.आरपीआयमध्ये कोणतेही गट नसून पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी माझ्या नावाची लेखी शिफारस केली होती. त्यामुळे आघाडीने आपला शब्द पाळायला हवा होता. नगरसेवकपदाची तिकीटे आमच्या कार्यकर्त्यांऐवजी त्यांच्याच दोन कार्यकर्त्यांना देऊन आरपीआयच्या कोट्यातील आहेत असे दाखवून त्यांना आघाडीच्या तिकीटावर निवडून आणले गेले. त्यानंतर स्वीकृत नगरसेवकपदाची निवडणूक होत असल्याचे कळवले नाही. स्वीकृत नगरसेवकपदासाठी अर्ज भरले जात असल्याची माहिती उशिराने मिळाली. त्यानंतर पालिकेत अर्ज भरण्यासाठी गेलो होतो. पण, आघाडीच्या गटनेत्याची शिफारस न मिळाल्याने माझा अर्ज बाद झाला. आमदार ठाकूरांनी त्यानंतरही स्वीकृत नगरसेवकपद देण्याचा शब्द दिला आहे. त्यांच्याकडून तो पाळला जाईल अशी अपेक्षा आहे.-ईश्वर धुळे, जिल्हाध्यक्ष (आरपीआय) दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जर ठरले असेल तर आमचे नेते दिलेला शब्द नक्की पाळतील. याबाबतीत वरिष्ठ पातळीवरच निर्णय घेतला जाईल.-उमेश नाईक, उपमहापौर