शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

घरत यांना निलंबित करा

By admin | Updated: October 12, 2016 03:51 IST

एका बेकायदा बांधकामप्रकरणी चुकीचे कारवाई करून त्याला संरक्षण देणारे सहाय्यक आयुक्त राजेश घरत यांच्यावर कारवाई करण्यात यावी

वसई : एका बेकायदा बांधकामप्रकरणी चुकीचे कारवाई करून त्याला संरक्षण देणारे सहाय्यक आयुक्त राजेश घरत यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार आनंद ठाकूर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.नवघर-माणिकपूर शहरातील १०० फुट रोड येथील सुप्रसिद्ध एव्हरशाईन इस्टेट सोसायटीमध्ये झुझर इस्माईल पटेल यांनी त्यांच्या घरासमोर सोसायटीच्या आवारात केलेल्या अनधिकृत आलिशान बांधकामाविरुद्ध सोसायटीने गेल्या ९ महिन्यापूर्वी रितसर तक्रार करूनही त्याची दखल सहाय्यक आयुक्त राजेश घरत यांनी घेतली नाही. याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार आनंद ठाकूर यांनी आयुक्त सतीश लोखंडे यांच्याकडे या बाबतीत विचारणा केल्यावर आयुक्तांनी अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या सूचना दिल्यावरून घरत यांनी अनधिकृत बांधकाम करणाऱ्या झुझर पटेल यांना अनधिकृत बांधकाम पाडण्याकरता नोटीस बजावली होती. मात्र, जाणीवपूर्वक जुजर पटेल असे चुकीचे नाव लिहून नोटीस बजावली. जेणेकरून कोर्टामध्ये स्टे मिळेल. त्यानंतर स्टे मिळाल्याचे कारण सांगून वेळ मारून नेली. अशाप्रकारे नाव चुकवणे, सातबारा नंबर चुकवणे इ. प्रकार पालिकेतील सहा.आयुक्त करीतच असतात, याकडे आमदार ठाकूर यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. काय आहे परिस्थिती-नोटीस चुकीची असल्याने झुझर पटेल यांच्या बांधकामांना अपेक्षेप्रमाणे कोर्टातून स्टे मिळाला. परंतु सोसायटीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि आमदार आनंद ठाकूर यांच रेट्यामुळे महापालिकेने न्यायालयीन प्रक्रिया करून स्टे उठवला. स्टे उठल्यानंतरही घरत कारवाही करीत नव्हते. शेवटी पुन्हा एकदा आमदार ठाकूर यांनी आयुक्त लोखंडे यांना पत्र देऊन या अनधिकृत बांधकामावर कारवाही करावी अन्यथा आम्हाला दखल घ्यावी लागेल असा इशारा दिल्यानंतर हे बांधकाम पाडण्यात आले. ...तरी एमआरटीपीचा गुन्हा नाही?च्बांधकाम पाडते वेळी झुझर पटेल यांनी पालिका अधिकारी नितीन वनमाळी यांच्या अंगावर धाऊन गेले. कॉलर पकडून धक्काबुक्की केली आणि बघून घेईन, सोडणार नाही अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. च्त्याचबरोबर दुसरे अधिकारी कौस्तुभ ताबोरे यांचाही गळा पकडून धमकी दिली. यावेळी अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी संरक्षण देण्याकरीता असणारी पोलीस यंत्रणा हजर असतनाही झुझर पटेल यांचेवर एम.आर.टी.पी. कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला नाही. च्यावेळी घरत स्वत: घटनास्थळी हजर होते. पण, कारवाई झाल्यानंतर पटेल यांच्यावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा नोंदवणे आवश्यक असताना नोंदवण्यात आला नाही. त्यामुळे याप्रकरणात घरत कर्तव्य बजावण्यात कसूर करत असून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी आमदार ठाकूर यांनी आयुक्तांकडे केली आहे.