शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

सेक्शन ३५ च्या जाचातून शेतकऱ्यांची होणार सुटका

By admin | Updated: March 20, 2016 00:47 IST

कोकणातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनीवर वनखात्याने ३५ सेक्शन लावले आहे. त्यामुळे या जमिनीवर शेतकऱ्यांना काही करता येत नाही. या विरोधात ' खाजगी वने बाधित शेतकरी

वाडा : कोकणातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनीवर वनखात्याने ३५ सेक्शन लावले आहे. त्यामुळे या जमिनीवर शेतकऱ्यांना काही करता येत नाही. या विरोधात ' खाजगी वने बाधित शेतकरी संघर्ष समिती' ने आंदोलन छेडली होती. या आंदोलनाची दखल घेत सरकारने राज्याचे अ‍ॅड. जनरल श्रीहरी आणे यांच्याकडून अहवाल मागविला होता. या अहवालात आणे यांनी जमिनीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी जे कोणी बाधित असतील त्यांची सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा असे सुचवले असल्याने या जाचक कायद्यातून शेतकऱ्यांची आता सुटका होणार आहे. कोकणातील ठाणे, पालघर, रायगड येथील बाधित शेतकऱ्यांनी खाजगी वने बाधित शेतकरी संघर्ष समिती स्थापन केली होती. या समितीत आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, खासदार कपिल पाटील, खासदार चिंतामण वनगा, माजी आमदार दिगंबर विशे, बाळकृष्ण पाटील, भगवान दुबेले, जगन पाटील, दिगंबर घुडे यांचा समावेश आहे. कोकणातील ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील सुमारे ३ लाख ८७ हजार हेक्टर खासगी खासगी जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर अन्यायाने वने अशी नोंद झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. वनखात्याच्या परवानगीशिवाय त्यांच्या जमिनीवर काहीही करता येत नाही. कोकणातील सुमारे ४५ हजार शेतकरी सेक्शन ३५ व अन्य जाचक कायद्यामुळे बाधित झाले आहेत. या संदर्भात महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राचे अ‍ॅड जनरल आणि यांचा सल्ला मागविला होता. या संदर्भात आणे यांनी आपल्या उत्तरात असे सुचवले आहे की, जिल्हाधिकाऱ्यांनी जे कोणी बाधित असतील त्यांची सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा, अशी माहिती समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा यांनी दिली. (वार्ताहर)