शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल घरफोड्यांकडून १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत तर ४ गुन्हे उघडकीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 02:02 IST

ह्या घरफोड्यां कडून १५ लाख २६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करून ४ गुन्हे काशिमीरा पोलिसांनी उघडकीस आणले आहेत अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. 

मीरारोड- मीरारोड मधील एका घरफोडी प्रकरणी अटक केलेले दोन्ही आरोपी हे अट्टल घरफोडी असून एकावर १० तर एकावर ९ गुन्हे दाखल आहेत. ह्या घरफोड्यां कडून १५ लाख २६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करून ४ गुन्हे काशिमीरा पोलिसांनी उघडकीस आणले आहेत अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. 

मीरारोडच्या पेणकरपाडा मधील रिक्षा चालक योगेश म्हात्रे यांच्या घराचे टाळे तोडून दागिने चोरी प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत होते. परिसरातील जवळपास १२५ सीसीटीव्ही फुटेज तपासल्या नंतर जगनसिंग तारासिंग कल्याणी (कलानी) ऊर्फ पाजी (वय ३९ ) रा. मरीआई नगर, कोलशेत, ठाणे ह्याला नाशिक मधून पकडले होते.  त्या नंतर हनुमंत बापुराव तांबे ( वय ३१ ) रा. महासांगवी, हनुमानवाडी, ता. पाटोदा जिल्हा बीड ह्याला पाटोदा मधून पोलिसांनी अटक केली होती.  

 आरोपीं कडून १४ लाख ५६ हजार रूपये किंमतीचे १३ तोळे २०६ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच गुन्हयात वापरलेली ७० हजार रूपये किमतीची दुचाकी व घरफोडीसाठी वापरलेले हत्यारं असा १५ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला.  घराची रेकी करून ते बंद असल्याचे हेरून घरफोडी करायचे. घरफोडी करताना ते हेल्मेट वा मास्क घालत जेणे करून त्यांची ओळख सीसीटीव्ही मध्ये कळून येऊ नये. त्यामुळे त्यांना शोधणे अवघड ठरत असे.  आरोपीनी काशीमीरा भागातील २ तर दहिसर येथील सराफा दुकानात व बीडच्या अंमळनेर पोलीस ठाणे हद्दीत केलेल्या एकूण चार घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. 

ह्या आधी देखील आरोपींवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. कलानी याच्यावर मुंबई, ठाणे, बीड, गुजरात भागात १० गुन्हे तर तांबे वर बीड भागात ९ गुन्हे दाखल असल्याची माहिती संदीप डोईफोडे यांनी दिली. सहाय्यक पोलीस आयुक्त गणपत पिंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे सह पोलीस पथक उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Notorious burglars arrested; stolen goods worth ₹15 lakh recovered.

Web Summary : Mira Road police arrested two habitual burglars, recovering ₹15.26 lakh worth of stolen goods. The accused, with multiple prior offenses, were caught after analyzing CCTV footage. Four burglaries in Kashimira, Dahisar, and Beed were solved.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस