शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

गावदेवीमातेच्या उत्सवाची चिंचघर येथे जय्यत तयारी

By admin | Updated: March 28, 2016 02:23 IST

गावात एकोपा निर्माण व्हावा यासाठी वर्षातून एकदा गावदेवी मातेचा साजरा केला जातो हे उत्सवाचे तिसरे वर्षे आहे. शनिवारी २ ते मंगळवार ५ एप्रिलपर्यंत उत्सव समितीच्यावतीने

वाडा : गावात एकोपा निर्माण व्हावा यासाठी वर्षातून एकदा गावदेवी मातेचा साजरा केला जातो हे उत्सवाचे तिसरे वर्षे आहे. शनिवारी २ ते मंगळवार ५ एप्रिलपर्यंत उत्सव समितीच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या उत्सवाचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी खासदार कपिल पाटील, आमदार शांताराम मोरे, तहसीलदार डॉ. संदीप चव्हाण, पोलीस निरीक्षक संजय हजारे, सभापती अरूण गौंड, उपसभापती नंदकुमार पाटील, जिप सदस्या धनश्री चौधरी, पं.स. सदस्या मेघना पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.चार दिवस चालणाऱ्या या उत्सवात शनिवार सकाळी देवीचे पूजन संध्याकाळी ४ पालघर जिल्हा स्तरीय कबड्डी सामन्याचे उद्घाटन सवरा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. रविवारी सकाळी पूजा आणि अग्निस्थापना दुपारी ३ वाजता महिलांसाठी संगीत खुर्ची रात्री ९ वाजता वासुदेव महाराज आर्विकर यांचे कीर्तन सोमवार सकाळी देवता पूजन दुपारी दोन वाजता महिलांसाठी हळदी-कुंकू सायंकाळी ४ वाजता शोभायात्रा व रात्री ९ वाजता डबलबारी भजनाचा जंगी सामना, मंगळवारी सकाळी ९ ते ११ मारेश्वर महाराज एकसाल यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसाद होईल. या उत्सवात लहान मुलांसाठी पाळण्याची जत्रा भरविण्यात आली आहे. चार दिवस चालणाऱ्या या धार्मिक सोहळ््यास भाविकांनी उपस्थित राहून गावदेवी मातेचे दर्शन, भजन, कीर्तन, कबड्डी सामने आदी कार्यक्रमाचे लाभ घेऊन सहकार्य करावे असे आवाहन गावदेवी उत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.