शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसईत बार, वाइन शॉपवर पोलीस अन् उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 12:20 AM

वसई तालुक्यात शहरी भागात सुमारे २००च्या घरात बार आहेत, याशिवाय १९ वाइन शॉप, २००च्या वर बीयरशॉप आणि देशी दारूची ४० दुकाने आहेत, तर ग्रामीण भागात ८ बार आहे.

मंगेश कराळे नालासोपारा : वसई तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात वाइन शॉप आणि बारचालक कोरोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी राज्य सरकारच्या, महानगरपालिकेच्या व जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या नियमावलीचे पालन करत आहेत. दारू उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस यांचे काटेकोरपणे या बाबीकडे लक्ष देऊन नियम पायदळी तुडवले जाणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. जे बारवाले नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांचे परवाने रद्द केले जातील, असे पोलिसांनी सांगितले.बार आणि वाइन शॉप मालकांना कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जाऊ नये, म्हणून नोटीसही देण्यात आल्याचे कळते.

वसई तालुक्यात शहरी भागात सुमारे २००च्या घरात बार आहेत, याशिवाय १९ वाइन शॉप, २००च्या वर बीयरशॉप आणि देशी दारूची ४० दुकाने आहेत, तर ग्रामीण भागात ८ बार आहे. देशी दारू व वाइन शॉपची दुकाने नसून २५ बीयर शॉप आहे. शहरात मात्र अनेक बीयर आणि वाइन शॉपच्या आवारात मद्यपान सुरू आहे. काही बीयर शॉपवाल्यांनी दुकानाच्या बाहेरच पार्टिशन टाकून दारू पिण्यासाठी ग्राहकांना सोय उपलब्ध करून दिली आहे. मात्र, वेळेच्या मर्यादा ठेवण्यात आल्या असून, त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाते. कोरोनाच्या काळात जिल्हाधिकारी यांनी ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार ग्रामीण भागात परमिट आणि बार सकाळी साडेअकरा ते रात्री दहा वाजेपर्यंत, वाइन शॉप सकाळी साडेदहा ते रात्री दहा, बीयर शॉप सकाळी साडेदहा ते रात्री दहा आणि देशी दारूची दुकाने सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत उघडी असतात. वसई-विरार मनपाच्या आयुक्तांनी १३ ऑक्टोबरला कोरोनाच्या काळात दिलेल्या नियमावलीनुसार शहरी भागात परमिट आणि बार सकाळी साडेअकरा ते रात्री साडेअकरा वाजेपर्यंत, वाइन शॉप सकाळी दहा ते रात्री साडेदहा, बीयर शॉप सकाळी दहा ते रात्री साडेदहा आणि देशी दारूची दुकाने सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत उघडी असतात.

जिल्हाधिकारी, आयुक्तांचे आदेशानुसार कोरोनाच्या महामारीमुळे बारचालकांना ५० टक्केच आसनव्यवस्था वापरण्यास सांगितलेली असून, त्यांना सेवासुविधा पुरवाव्या. कर्मचाऱ्यांना आणि ग्राहकांना मास्क वापरणे बंधनकारक केलेले आहे. ग्राहकाचे सॅनिटायझर आणि शरीराचे तापमान चेक करणे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता ठेवणे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस