पालघर जिल्ह्यात नव्या योजना राबवा!

By Admin | Updated: April 23, 2016 01:36 IST2016-04-23T01:36:05+5:302016-04-23T01:36:05+5:30

शेतकऱ्यांसाठी शासन विविध योजना राबवित आहे. या योजनांबरोबरच पालघर जिल्हयातील शेतकऱ्यांसाठी नाविण्यपूर्ण योजना राबवून शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी

Palghar district plans new! | पालघर जिल्ह्यात नव्या योजना राबवा!

पालघर जिल्ह्यात नव्या योजना राबवा!

पालघर : शेतकऱ्यांसाठी शासन विविध योजना राबवित आहे. या योजनांबरोबरच पालघर जिल्हयातील शेतकऱ्यांसाठी नाविण्यपूर्ण योजना राबवून शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना आदिवासी विकासमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना.विष्णू सवरा यांनी केल्या.
खरीप हंगाम आढावा बैठक-२०१६ सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार सर्वश्री आनंद ठाकूर, अमित घोडा, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे, जि.प.चे कृषी सभापती अशोक वडे तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी बांगर यावेळी म्हणाल कीे, पुढील दोन महिने खरिप पिकांसाठी अत्यंत महत्वाचे असूनकृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळेत बि-बियाणे तसेच खतांचा पुरवठा करण्याबाबत योग्य ते नियोजन करावे. (प्रतिनिधी)

Web Title: Palghar district plans new!