शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांची चालूगिरी

By admin | Updated: October 11, 2016 02:41 IST

माहिती अधिकारा अंतर्गत तलासरी तालुक्यातील ग्रामपंचायतींना विचारलेली माहिती देण्यात ग्रामसेवकामध्ये अनास्था दिसून येत

सुरेश काटे / तलासरीमाहिती अधिकारा अंतर्गत तलासरी तालुक्यातील ग्रामपंचायतींना विचारलेली माहिती देण्यात ग्रामसेवकामध्ये अनास्था दिसून येत आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये घरकुलांचे कामात, व जण सुविधांच्या कामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे जाणवत आहे. आदिवासी लाभार्थ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत घरकुलाचा निधी हडपण्यात आला असल्याची चर्चा होती. त्यामुळे तलासरी तालुक्यातील आदिवासी लाभार्थी घरकुला पासून वंचित आहेत वा त्यांची घरकुले अर्धवट आहेत.या घरकुलांचे कामाची माहिती घेण्यासाठी काजळी, करंजगाव, कोदाड, सावरोली, वडवली, वसा, संभा, डोंगारी, गिरगाव, उपलाट, झरी, वरवाडी व झाई ग्रामपंचायतींना माहिती अधिकाराचे अर्ज देण्यात आले. पण घरकुलांचे व जन सुविधांच्या कामाची माहिती दडविण्याचा प्रकार सुरु आहे का? असा प्रश्न अर्जदाराकडून विचारला जात आहे. याप्रकरणी तलासरी पंचायत समिती विस्तार अधिकारी ग्रामपंचायत यांच्याकडे अपील करण्यात आले. परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तलासरी पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी तथा अपिलीय अधिकारी बापुसाहेब नाळे यांच्या समोर झालेला सूनावणीस तब्बल १३ ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक माहिती घेऊन न येता हात हलवीत आले. महत्वाचे म्हणजे त्यातील फक्त सहाच जण यावेळी उपस्थित होते. जन माहिती अधिकाऱ्याने चार दिवसात अपीलकर्त्यास माहिती द्यावी असा आदेश अपिलीय अधिकारी यांनी दिला. मात्र त्याकडेही या ग्रामसेवकांनी पाठ केली आहे.