शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाची फक्त औपचारिकताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 02:48 IST

राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताहा निमित्त वाहतूक पोलिसांच्यावतीने नागरिकांमध्ये जनजागृती सुरु असून त्यानिमित्ताने रविवारी रॅलीचेही आयोजन केले होते

आरिफ पटेल मनोर :  राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताहा निमित्त वाहतूक पोलिसांच्यावतीने नागरिकांमध्ये जनजागृती सुरु असून त्यानिमित्ताने रविवारी रॅलीचेही आयोजन केले होते. आठवडाभर ही औपचारिकता दिसणार असून त्यानंतर पुन्हा वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून रस्त्यावर धुमाकुळ घालणारे वाहनचालक व त्याकडे दुर्लक्ष करणारे पोलीस पहावयास मिळतील असे येथील सुजाण नागरिकांचे म्हणने आहे.नुकताच हा दिवस वाहतूक नियंत्रण शाखा दुर्वेस मनोर येथे उत्सहात साजरे करण्यात आला. आमदार विलास तरे, शिवसेना जिल्हाप्रमुख (ग्रामिण) वसंत चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. मात्र, ही दरवर्षीची औपचारिकता ठरत असून खऱ्या अर्थाने वाहतूकीचे नियम व रस्ते सुरक्षा हा विषय हाताळला जात नसल्याची स्थितीती गत वर्षभरामध्ये वाहतूक विभागामार्फत झालेली दंडात्मक कारवाईची आकडेवरीत सांगते आहे.या सप्ताहाच्या निमित्तात पोलीस दलाच्या वाहतूक शाखेकडून विद्यार्थी व नागरिकांना मोटर वाहन कायद्याचे नियम, सुरक्षितता, अपघातग्रस्तांना कशी मदत करावी या बाबत माहिती व प्रात्यक्षिक दाखविले जाते. मात्र, इतर दिवशी दुर्वेस, कासा, तलासरी, चिंचोटी, वसई व पालघर ट्रिपल सिट बाईक स्वार, ओव्हर टेक, पकडल्यावर परवाना दाखविण्या आगोदर चिरीमिरी हे चित्र नेहमीचे झाले आहे.उपलब्ध माहितीनुसार महामार्ग पोलीस, मनोर यांच्या हद्दीमध्ये २०१७ या वर्षामध्ये १३,८१९ मोटार वाहन केसेस झाल्या असून अपघातांची संख्या १०२ आहे. त्यात १९ जणांचा मृत्यू झाला असून ५९ जण गंभीर जखमी झाले होते. वर्ष २०१८ मध्ये (मार्च पर्यंत) २७ अपघातांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. यात १३ जण गंभीर जखमी झाले आहेत.