शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन यंत्रणा फेल, दाखल्यासाठी महिना

By admin | Updated: May 12, 2017 01:23 IST

डहाणू महसूल विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे दाखल्यांसाठी वणवण फिरण्याची वेळ नागरिकांवर ओढवली आहे. दाखल्यासाठी

लोकमत न्यूज नेटवर्क बोर्डी : डहाणू महसूल विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे दाखल्यांसाठी वणवण फिरण्याची वेळ नागरिकांवर ओढवली आहे. दाखल्यासाठी महिनाभर प्रतिक्षा करण्याचा सल्ला कर्मचाऱ्यांकडून दिला जात असल्याने एका क्लिकवर आॅनलाइन दाखले देण्याची या विभागाची यंत्रणा व कार्यपद्धती फोल ठरल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. आगामी वर्षातील पाल्याच्या शैक्षणिक प्रवेशाकरिता आवश्यक दाखले मिळविण्यासाठी पालकवर्ग कामाला लागला आहे. उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, डोमेसाईल अशा विविध दाखल्यांकरिता अर्जसोबत जोडावयाच्या कागदपत्रांची जमवाजमव केल्यानंतर संबंधित गावच्या तलाठ्यांची भेट घेण्यात वेळ आणि पैसा खर्ची घालावा लागत आहे. मात्र काही तलाठी कार्यालयाकडे फिरकत नसल्याने त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. दरम्यान मोठ्या मुश्किलीने तलाठ्याकडून सही- शिक्का मिळवल्यानंतर सुद्धा सेतु कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून अर्ज घेण्यास टाळाटाळ केली जाते. शिवाय महा-ई सेवा केंद्राकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. सेतू कार्यालय हा महसूल प्रशासनाचा विभाग असून येथे विविध दाखल्याकरिता आलेले अर्ज स्वीकारून दाखला निर्धारीत दिवसात देणे आवश्यक आहे. महा-ईसेवा केंद्रात अर्ज केल्यास त्याकरीता जादा पैसे आणि दुप्पट दिवस खर्च होतात. शिवाय डिजिटल सहीची प्रक्रियाही अडथळा ठरते आहे.