शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
3
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अॅक्शन मोडवर, अॅडव्हायजरी जारी
4
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
5
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
6
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
7
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
8
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
9
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
10
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
11
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
12
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
13
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
14
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
18
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
19
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
20
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू

नेट डाउनमुळे लसीकरणात खाेडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 11:41 PM

पालघरमध्ये तिसरा टप्पा सुरू; दिवसभरात ८६ नागरिकांनी घेतली कोरोना लस

हितेंन नाईक लोकमत न्यूज नेटवर्क पालघर : १ मार्चपासून संपूर्ण पालघर जिल्ह्यात कोविड १९ लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात करण्यात आली. सरकारी १० लसीकरण केंद्रांवर ६० वर्षे वयोगटावरील ८२ तर ४५ ते ५९ वयोगटातील ४ अशा एकूण ८६ जणांना लस देण्यात आली. या लसीकरण मोहिमेसाठी नेटचा प्रॉब्लेम असल्याने ही मोहीम राबविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आले. सोमवारपासून लसीकरणासाठी  ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ८२ ज्येष्ठ आणि ४५ वर्षे ते ५९ वर्षे वयोगटातील दुर्धर आजार असलेल्या नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी प्रमाणित असलेल्या प्रमाणपत्रधारक चार व्यक्तींचे लसीकरण झाले. मोबाइलद्वारे चार लोकांची नोंदणी करण्याची परवानगी आहे. तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी जवळच्या  केंद्रावर जाऊन वा  कॉलसेंटर क्रमांक १५०७ शी संपर्क साधण्याचे आवाहन केले.या दहा सरकारी केंद्रांत सुरू  डहाणू, जव्हार, कासा उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय पालघर (जेजे हेल्थ युनिट), टिमा हॉस्पिटल, तलासरी, मोखाडा, वाडा, विरार ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र मलवाडा व  महापालिकेतील ‘वरुण इंडस्ट्रीज’. या दहा सरकारी केंद्रांत सुरू  डहाणू, जव्हार, कासा उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय पालघर (जेजे हेल्थ युनिट), टिमा हॉस्पिटल, तलासरी, मोखाडा, वाडा, विरार ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र मलवाडा व  महापालिकेतील ‘वरुण इंडस्ट्रीज’. लसीकरण केलेली केंद्रे ज्येष्ठ नागरिकांपैकी पालघर ग्रामीण रुग्णालय ११, उपजिल्हा रुग्णालय जव्हार १, डहाणू उपजिल्हा रुग्णालय ९, टिमा हॉस्पिटल २४, ग्रामीण रुग्णालय वाडा १, ग्रामीण रुग्णालय विरार ७, महापालिकेतील ‘वरुण इंडस्ट्रीज’ येथे २९ जणांना लस दिली.अनेक रुग्णांनी धरला घरचा रस्तालसीकरण करण्यासाठी ज्या खाजगी नेट सेवा आरोग्य विभागाने घेतल्या आहेत, त्या सेवा विस्कळीत झाल्याने अनेक रुग्णांची नोंद सॉफ्टवेअरमध्ये होत नव्हती. परिणामी, काही ज्येष्ठ रुग्णांना घरचा रस्ता धरावा लागला. अशा रुग्णांनी मंगळवारी सकाळी नाश्ता करून लसीकरण केंद्रात उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लसीकरणाला हळूहळू सुरुवात करण्यात आली असून, ज्येष्ठ नागरिकांनी उद्यापासून आधार कार्ड आणि मोबाइल घेऊन यावे. तसेच खाजगी रुग्णालयांसाठी उद्या लसींचे वाटप करण्यात येणार आहे. - डॉ. मिलिंद चव्हाण, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी

ज्येष्ठ नागरिक म्हणून चांगली वागणूक मिळाली. सुरक्षित अंतर राखून डोस देण्यात आले. ताप आल्यास गोळ्या देण्यात आल्या असून, काही समस्या उद्भवल्यास वैद्यकीय अधीक्षकांचा मोबाइल नंबरही देण्यात आला आहे. - प्रदीप पाटील, ज्येष्ठ नागरिक, टेंभाेडे

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस