वाहतूककोंडीकडे पोलिसांचे दुर्लक्ष

By Admin | Updated: April 23, 2016 01:45 IST2016-04-23T01:45:04+5:302016-04-23T01:45:04+5:30

मस्ताननाका (मनोर) पालघर रस्त्यावर मनोर बसस्थानक ते बाजारपेठ पोलीस ठाण्यापर्यंत दररोज वाहतुक कोंडी होत असल्याने वाहतुकदार व प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत

Negligence of the traffic police | वाहतूककोंडीकडे पोलिसांचे दुर्लक्ष

वाहतूककोंडीकडे पोलिसांचे दुर्लक्ष

मनोर : मस्ताननाका (मनोर) पालघर रस्त्यावर मनोर बसस्थानक ते बाजारपेठ पोलीस ठाण्यापर्यंत दररोज वाहतुक कोंडी होत असल्याने वाहतुकदार व प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. ही कोंडी सोडविण्यासाठी एकही पोलीस दिसत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
पालघर जिल्ह्याचे मुख्यालय पालघरला असल्यामुळे मनोर भागातून वाहनांची संख्या वाढली आहे. मात्र मस्ताननाका मनोर ते पालघर या रस्त्याची रुंदी वाढली नाही. मनोर बसस्थानक ते बाजार पेठ पोलीस ठाण्यापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण झाल्याने वाहतुक कोंडी होते. तासनतास प्रवाशांना ताटकळत बसावे लागते. शिवाय बाजारपेठ असल्याने माल उतरविण्यासाठी येणारे वाहने उभी असल्याने रहदारी आणखी मंदावते. (वार्ताहर)

Web Title: Negligence of the traffic police