शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

थकीत पाणीपट्टी न भरणाऱ्या वसईकरांना मनपाचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 09:47 IST

वसई : वसई-विरार शहर महापालिकेने सुरू केलेल्या व्यापारी परवाना नूतनीकरण कराचे प्रकरण ताजे असताना आता शहरातील ज्या नागरिकांनी पाणीपट्टीची ...

वसई : वसई-विरार शहर महापालिकेने सुरू केलेल्या व्यापारी परवाना नूतनीकरण कराचे प्रकरण ताजे असताना आता शहरातील ज्या नागरिकांनी पाणीपट्टीची थकबाकी भरणा केली नाही, त्यांच्या नळजोडण्या खंडित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. महापालिकेच्या पाणीपट्टी विभागामार्फत महापालिका क्षेत्रातील पाणीपट्टी अदा न केलेल्या २०० हून अधिक नळ जोडण्या खंडित केल्या आहेत. दरम्यान, कोरोनाचे संकट अजूनही पालिका हद्दीत सुरूच आहे, तर बहुतेक नागरिकांचे उद्योगधंदे, व्यवसाय आणि नोकऱ्याही सुटल्या आहेत. अशा वातावरणात विविध प्रकारच्या कर आकारणीमुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.वसई-विरार शहर महापालिका कार्यक्षेत्रातील नळजोडणीधारकांनी २०२०-२१ या आर्थिक वर्षात मागील थकबाकीचा भरणा केलेला नाही, अशा नळजोडणीधारकांकडून मागील पाणीपट्टी कराची थकबाकी वसूल करण्याच्या अनुषंगाने नळजोडणी खंडित करण्याची मोहीमच हाती घेण्यात आली आहे. या तोडू कारवाईअंतर्गत खंडित करण्यात येणारी नळजोडणी पाणीपट्टीची थकीत रक्कम भरणा केल्यानंतर पुन्हा वितरण वाहिनीवर जोडण्यासाठी रु. २५००/- प्रति जोडणी अशी आकारणी करण्यात येईल, असा फतवादेखील महापालिका प्रशासनाने काढला होता. या नोटिसीमध्ये थकीत पाणीपट्टीधारकांनी पाणीपट्टी कराची थकबाकी रक्कम आपल्या नजीकच्या महानगरपालिका कार्यालयात भरणा करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले होते, त्यानुसार महापालिकेच्या पाणीपट्टी विभागामार्फत पाणीपट्टी थकबाकीधारकांच्या नळ जोडण्या खंडित करण्यात येत आहेत. या कारवाईत आतापर्यंत २०० हून अधिक नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत, असे पाणी विभागामार्फत सांगण्यात आले आहे.नागरिक गेले १० महिने घरीच आहेत, लोकल ट्रेन सुरू झाल्या नाहीत, नागरिकांची आर्थिक परिस्थिती ठीक नाही, अशा परिस्थितीत नळ जोडण्या खंडित केल्या जात असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. दरम्यान, वसई-विरार महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुद्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

कोरोनाकाळात कारवाई अयोग्यवसई-विरार महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वत्र उमेदवारीची चर्चा रंगत आहे, अशा वातावरणात नळ जोडण्या खंडित करण्याचा विषय तापणार असून विविध पक्ष महापालिकेच्या या धडक कारवाईबाबत आक्षेप घेत, कोरोनाकाळात अशा प्रकारची कारवाई योग्य नसल्याचे पक्षाचे पदाधिकारी सांगत आहेत. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी