शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
3
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
4
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
5
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
6
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
7
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
8
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
9
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
10
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
11
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
12
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
13
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
14
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
15
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
16
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
17
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
18
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
19
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
20
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई अहमदाबाद महामार्ग खचला, अवजड वाहनांची चाके अडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 16:10 IST

खचलेल्या रस्त्यावर वाहनांचे टायर अडकल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

मंगेश कराळे

पहिल्याच पावसात मुंबई अहमदाबाद महामार्ग खचला असून वसई हद्दीतील मालजीपाडा परिसरातील जे के टायर शो रूम जवळ सूर्या पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू असल्याने हा महामार्ग खचला आहे. माती खचण्याची ही गेल्या १० दिवसातील दुसरी घटना आहे. अवजड वाहनांची चाके रस्त्यात अडकल्याने मुंबई अहमदाबाद महामार्ग ठप्प झाला होता. सध्या खचलेला रस्ता दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते. खचलेल्या रस्त्यावर वाहनांचे टायर अडकल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. महामार्ग पोलिसांकडून वाहन बाजूला काडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. दहा दिवसा पूर्वी घोडबंदर जवळ मीरा भाईंदरला पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्याच्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु असताना माती धस्ली आणि त्यात जेसीबीसह त्याचा चालक माती खाली गाडला गेला होता. त्याचे पुढे काय झाले ते अजून समजले नाही. त्यातच मुंबई अहमदाबाद महामार्गावर सीमान्त काँक्रिटीकरण सुरु असल्याने अगोदरच प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असताना आता रस्ता खचल्याने त्याचा हि त्रास सहन करावा लागत आहे. येत्या पावसाळ्यात महामार्गावरील सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण न झाल्याने रस्त्यावर खाद्याचे साम्राज्य असणार असल्याचे चित्र आता पासूनच दिसत आहे. त्यामुळे पावसाळ्यात या महामार्गावरून प्रवास करताना सांभाळून करावा लागणार आहे.

टॅग्स :Rainपाऊस