शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

मोखाड्याची वैतरणा नळ पाणीपुरवठा योजना बारगळली?; रोज मरे त्याला कोण रडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 23:31 IST

रोज मरे त्याला कोण रडे

रवींद्र साळवेमोखाडा :  मोखाड्याची पाणीटंचाई  म्हणजे ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी झाली आहे. तालुक्यातील काही गावांना नळ पाणीपुरवठा योजना राबवल्या गेल्या असल्या, तरी त्यांचे स्रोत हे विहिरीच असल्याने या योजनाही निकामी ठरल्या आहेत. यामुळे तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मुंबईतील आयआयटीने सुचवलेल्या अप्पर वैतरणा धरणातील १ टक्के पाणीसाठ्यावरील योजनेचा जिल्हा नियोजन समितीमार्फत २० लाख रुपये खर्च करून सर्व्हेही करण्यात आला होता. या योजनेस मुंबई महापालिकेने हिरवा कंदील दर्शविला होता. तरीही प्रस्तावित अप्पर वैतरणा सामूहिक पाणीपुरवठा योजना बारगळल्याचे दिसून येत आहे. 

२०० कोटींच्या बजेटमधून संपूर्ण मोखाडा तालुक्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो, परंतु याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. उलट गोदावरी नदीच्या पात्रात  पाणी सोडण्याच्या अट्टाहासासाठी मागील दोन वर्षांपूर्वी तालुक्यातील चिंचुतारा, भेंडीचापाडा, बेडूकपाडा, उधळे, वडाचापाडा या ठिकाणी शासनाने धरण  बांधण्याची योजना आखली होती, परंतु या प्रकल्पात ३ हजार ८२ एकर  जमीन बुडीत क्षेत्र पाण्याखाली येणार आहे.  ७४ एकर जमीन पाटासाठी संपादित होणार आहे. १३३ एकर जमीन इतर  कामासाठी संपादित होणार आहे.  

मुख्यमंत्री दखल घेणार का?मुंबई पालिकेने या योजनेला त्या वेळेस हिरवा कंदील दिला होता. सध्या राज्यात, मुंबई महानगरपालिकेत आणि मोखाडा पंचायत समितीवरदेखील शिवसेनेची सत्ता आहे. मध्य वैतरणा धरणाचे पाणी १०० किमी अंतरावर मुंबईला पुरवले जाते, परंतु दरवर्षी येथील आदिवासींना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची दखल घेऊन  संपूर्ण तालुक्याचा पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायला हवा. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी