शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल तिकीट अजूनही प्रतीक्षेत

By admin | Updated: August 4, 2014 01:09 IST

मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे तिकीट आरक्षण केल्यास त्यांची सद्य:स्थिती मोबाइलवर दिली जाणार असून ही सेवा लवकरच रेल्वे मंत्रालयाकडून सुरू केली जाणार आहे

मुंबई : मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे तिकीट आरक्षण केल्यास त्यांची सद्य:स्थिती मोबाइलवर दिली जाणार असून ही सेवा लवकरच रेल्वे मंत्रालयाकडून सुरू केली जाणार आहे. असे असतानाच अद्याप मात्र लोकलचे उपनगरीय तिकीट मोबाइलवर उपलब्ध करण्याची सुविधा देण्यात आलेली नाही. दोन वर्षे उलटून गेली तरी त्यावर विचारच सुरू असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकिटांचे आरक्षण केल्यावर त्यांची सद्य:स्थिती आपल्याला रेल्वेच्या वेबसाइटवर मिळत जाते. यासाठी संगणक सुरू करा, त्यानंतर रेल्वेच्या (आयआरसीटीसी) वेबसाइटवर जाऊन ते पाहण्यात बराच वेळ जातो. हे पाहता त्याला पर्याय म्हणून एसएमएस अ‍ॅलर्ट अशी सेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. संबंधित प्रवाशाने आरक्षण फॉर्मवर असलेल्या मोबाइल नंबरच्या कॉलममध्ये आपला मोबाइल नंबर दिल्यास ही सेवा त्या प्रवाशाला मिळेल. प्रवाशाचे तिकीट ज्या तारखेचे असेल, त्याच्या पाच दिवस अगोदर असा प्रत्येक दिवशी एक एसएमएस प्रवाशाच्या मोबाइलवर रेल्वेकडून येईल. या एसएमएसमधून तिकीट आरक्षणाची सद्य:स्थिती दिली जाईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले. मात्र, ही सुविधा देण्याचा निर्णय घेतला जात असतानाच ७५ लाख प्रवासी असलेल्या मुंबईतील उपनगरीय लोकल प्रवाशांचे अशाच प्रकारच्या तिकीट सुविधेकडे लक्ष लागलेले आहे. उपनगरीय लोकलचे तिकीट मोबाइलद्वारे बुक करण्याची सुविधा सुरू करण्यात येणार होती. मात्र, दोन वर्षांपेक्षा जास्त काळ लोटूनही ही सेवा सुरू करण्यात आलेली नाही. सध्या आयआरसीटीसीमार्फत अशी पास सेवा असली तरी त्यामध्ये अधिक शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळे त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात आले. लोकलचे तिकीट मोबाइलवर बुक केल्यास प्रवाशांची तिकिटांच्या रांगेतून सुटका होऊ शकते. मात्र, ही सेवा देताना अनेक तांत्रिक अडचणी असून त्यामुळे आणखी एक वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)