शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
2
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
3
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
4
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
5
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
6
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
7
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
10
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
12
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
13
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
14
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
15
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
16
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
17
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
18
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
19
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
20
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे कोट्यवधी रुपये मनपाने थकवले; अनधिकृत बांधकामावर कारवाई कशी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 03:01 IST

वसई - विरार शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत ९ प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत अनेक तक्रारी आल्या.

- मंगेश कराळेनालासोपारा : वसई - विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातून बंदोबस्त मागवला जातो. महानगरपालिकेने या अनधिकृत बांधकामांवर कारवाई तर केली, पण मागवलेल्या पोलीस बंदोबस्ताचे पैसे मात्र अद्याप देण्यात आलेले नाहीत. हे कोट्यवधी रुपयांचे देणे महानगरपालिकेने थकवले असल्याची जोरदार चर्चा असून या थकबाकीमुळे अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याची खंत मनपा अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली आहे.वसई - विरार शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत ९ प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत अनेक तक्रारी आल्या. त्यानंतर त्यावर कारवाई करण्यासाठी त्या - त्या प्रभागाच्या सहा. आयुक्तांकडून स्थानिक पोलीस ठाण्यात पत्रव्यवहार करून पोलीस बंदोबस्त मागवला जातो. या बंदोबस्तासाठी महानगरपालिकेला पैसे भरावे लागतात, पण कारवाई झाल्यानंतरही हे पैसे न भरल्याने आता हा आकडा कोट्यवधींच्या घरात पोहोचल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. पालघर जिल्ह्यातील विरार, नालासोपारा, तुळींज, वालीव, अर्नाळा, माणिकपूर आणि वसई या सात पोलीस ठाण्यातून पोलीस बंदोबस्त घेऊन महानगरपालिकेने हे देणे थकवल्याचे कळते. नेमका हा आकडा किती आहे ते अद्याप गुलदस्त्यात असून पोलीस आणि महानगरपालिकेकडे विचारणा केल्यास टाळाटाळ केली जाते. याबाबत नेमके किती पैसे देणे बाकी आहे, अशी विचारणा पालघर पोलिसांना करण्यात आल्यावर ही अंतर्गत बाब असून ही माहिती देण्यास त्यांनी टाळाटाळ केली. तर एका पोलीस अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, पैसे देणे बाकी असल्याने प्रभागाचे सहा. आयुक्त आणि अधिकारी त्यांच्या प्रभागातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी जाताना पोलीस बंदोबस्तही घेत नाहीत. तसेच साधा पत्रव्यवहारही करत नाहीत. अनधिकृत बांधकामाबाबत अनेक तक्रारी असतानाही पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण देत ही कारवाई अधिकाऱ्यांकडून टाळली जाते.हा अंतर्गत मामला असून महानगरपालिका पोलीस बंदोबस्त मागते तर त्याचे जे काही देयक असेल ते नक्कीच देणार आहे. काही थकीत आहे, ते देखील पूर्ण देऊन टाकणार आहे. पैसे थकीत असल्याने आता अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी जाताना पोलीस बंदोबस्त मिळत नाही.- बळीराम पवार (आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका)

टॅग्स :Vasai Virarवसई विरार