शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

मालवणी जत्रोत्सवातून रोजगार

By admin | Updated: December 25, 2016 00:13 IST

मालवणी जत्रौेत्सवातून तरुणांसह ,महिलांना एक रोजगाराचे केंद्र उपलब्ध होत आहे. याची सुरुवात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी करून कोकणवासीयांना

वसई : मालवणी जत्रौेत्सवातून तरुणांसह ,महिलांना एक रोजगाराचे केंद्र उपलब्ध होत आहे. याची सुरुवात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी करून कोकणवासीयांना व्यावसायिक प्रोत्साहन देण्याचे काम केले.जास्तीत जास्त तरुणांनी व्यवसायात उतरले पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी वसईत केले. वसई पश्चिमेकडील मालवणी जत्रौत्सव व बालनगरीचे उदघाटन सेनेचे उपनेते अनंत तरे यांच्या हस्ते करण्यात आले नवघर माणिकपूर शहर व साईनगर शाखेच्या सहकार्याने वसईत मालवणी जत्रौत्सवाचे करण्यात आले आहे. उदघाटन प्रसंगी सेनेचे उपनेते अनंत तरे यांच्यासह वसई तालुका प्रमुख तेंडोलकर, नगरसेवक स्वप्नील बांदेकर, नगरसेविका किरण चेंदवणकर, प्रीती म्हात्रे, शिल्पा सिंग, माजी विरोधी पक्ष नेता विनायक निकम, उपतालुकाप्रमुख अतुल पाटील, नालासोपारा शहरप्रमुख जितेंद्र शिंदे, उपजिल्हा महिला संघटक प्राची फणसे, नवघर माणिकपूर शहरप्रमुख राजाराम बाबर ,वसई विधानसभा संघटक श्याम शिरोडकर , उपजिल्हाप्रमुख विवेक पाटील,विभागप्रमुख शशीभूषण शर्मा उपस्थित होते.यावेळी प्रकाश जाधव यांनी कोकणी पद्धतीने गाऱ्हाणे घातले. याठिकाणी एकूण ५० दुकाने लावण्यात आली असून खास मालवणी पद्धतीचे पदार्थ ठेवण्यात आले असून महिला बचत गटांना याठिकाणी प्राधान्य देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)