शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जागावाटपात मतदारसंघ शिवसेनेकडे, नालासोपाऱ्यात भाजप बंडाच्या पवित्र्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 00:00 IST

नालासोपारा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. यामुळे येथील भाजपच्या राजन नाईक यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बंडाचे हत्यार उपसले

नालासोपारा : विधानसभा निवडणुकीसाठी अपेक्षेप्रमाणे युतीची घोषणा झाली आणि नालासोपारा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. यामुळे येथील भाजपच्या राजन नाईक यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बंडाचे हत्यार उपसले असून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे सूत्रांकडून कळते. राजन नाईक हे निवडणुकीला उभे राहिले तर सेनेच्या प्रदीप शर्मा यांना ही निवडणूक खडतर जाणार असून बविआला विजयाचा मार्ग सुकर होईल, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या राजन नाईक यांना ६० हजार तर सेनेच्या शिरीष चव्हाण यांना ४० हजार मते मिळाली होती. पण युती न झाल्याने बविआचे क्षीतिज ठाकूर निवडून येत ते आमदार झाले. सेनेचा या मतदारसंघात फारसा प्रभाव नाही. तर दुसरीकडे या निवडणुकीत राजन नाईक यांना उमेदवारी मिळून त्यांना निवडून आणण्यासाठी आणि पक्ष वाढीसाठी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेत मतदारांशी जनसंपर्क वाढवला होता.भाजप पदाधिकारी मनोज बारोट यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, नाईक यांना उमेदवारी मिळावी यासाठी गेल्या ५ वर्षात पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी जीव तोडून मेहनत केली होती.मतदारांचा कौल आजमावतोयमला उमेदवारी मिळावी अशी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मागणी असून अपक्ष निवडणूक लढवण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. मतदारांशी संपर्क सुरू असून मतदारांचा कौल घेत आहे. सेनेने स्थानिकांना उमेदवारी देण्याऐवजी आयात उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. यापेक्षा जो उमेदवार सहा वर्षे पक्षाचा सदस्य आहे त्यांना निवडणुकीत उमेदवारी देण्यात यावी. - राजन नाईक (भाजपचे नाराज उमेदवार)प्रदीप शर्मा ३ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज....सेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा हे ३ आॅक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nalasopara-acनालासोपारा