शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात दोन दिवस वीज गायब

By admin | Updated: September 23, 2015 03:54 IST

विक्रमगड महावितरणचा गलथान कारभार नेहमीचाच आहे. मात्र, सणासुदीच्या काळात तरी व्यवस्थित सेवा मिळावी अशी इच्छा असताना तालुक्यातील कुंर्झे गावठण

विक्रमगड : विक्रमगड महावितरणचा गलथान कारभार नेहमीचाच आहे. मात्र, सणासुदीच्या काळात तरी व्यवस्थित सेवा मिळावी अशी इच्छा असताना तालुक्यातील कुंर्झे गावठण आणि परिसरातील दहाहुन अधिक गावांमध्ये शुक्रवारी रात्रीपासून विद्युत पुरवठा बंद झाला. त्यामुळे गणेशभक्तांसह नागरीकांमध्ये महावितरणविरोधात संतापाची लाट उसळली आहे.शुक्रवारी रात्री खंडीत झालेला वीजपुरवठा शनिवारी रात्री सुरू झाला. मात्र, जेमतेम तीन तास टिकून पुन्हा वीज खंडीत झाली ती सोमवारी सकाळी दहा वाजता सुरळीत झाली. मात्र अधुन मधून विजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार सुरूच असल्याने याबाबत गणेशभक्तांनी विजवितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या कॉलला उत्तर देण्याचे अधिकाऱ्यांनी टाळले. याबाबत विक्रमगड महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता नानोठ यांच्याशी संपर्क केला असता आमचे काम सुरू आहे, लाईट दोन किंवा तीन तासात येईल अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. दरवर्षी पावसाळ्याआधी ही कामे करणे गरजेचे असते. मात्र विक्रमगड तालुक्यात महावितरण ही कामे व्यवस्थित करीत नसल्याने नागरीकांना याचा त्रास होतो. महावितरणचा गलथान कारभार हा नेहमीचाच असल्याचे सर्व कामांची चौकशी होणे गरजेचे असल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद ठाकरे यांनी सांगितले. (वार्ताहर)