शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

घोलवड, बोर्डी रोड रेल्वे स्थानके दुर्लक्षित

By admin | Updated: July 10, 2015 22:27 IST

महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील पालघर जिल्ह्यातील घोलवड आणि बोर्डी रोड रेल्वे स्थानकांत समस्यांचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत चालला आहे

बोर्डी : महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील पालघर जिल्ह्यातील घोलवड आणि बोर्डी रोड रेल्वे स्थानकांत समस्यांचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत चालला आहे. पश्चिम रेल्वे प्रशासन, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे नागरिकांवर जीव गमावण्याची वेळ ओढवली आहे.पश्चिम रेल्वेची घोलवड आणि बोर्डी रोड रेल्वे स्थानके भौतिक व पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे प्रवाशांना शारीरिक, मानसिक त्रास होतो. बोर्डी रोड स्थानकात प्लॅटफॉर्म नाही. घोलवड स्थानकात प्लॅटफॉर्म आहेत, मात्र शेड नाही. अस्वच्छ शौचालयांमुळे परिसरात दुर्गंधी येते. स्थानकाच्या उभारणीत नियोजनशून्यता दिसते. कारण, प्लॅटफॉर्म क्र. १ अस्तित्वात नाही. जागेअभावी उभारणी करणे कठीण दिसते.दिवसभरात एक एक्स्प्रेस गाडीला थांबा आहे. शटल, पॅसेंजर, मेमो गाड्यांमध्ये एक ते दीड तासाचे अंतर आहे. गाड्यांशी कनेक्टेड एसटी, आॅटो रिक्षा यांची संख्या मर्यादित असल्याचे हे महत्त्वाचे कारण आहे.खेड्यापाड्यांतील प्रवासी वाहने मिळविण्याकरिता चालत्या गाडीतून उतरण्याची जोखीम घेतात. निम्म्यापेक्षा अधिक प्रवासी जिन्याचा वापर करीत नाहीत. लोखंडी पट्ट्यांच्या संरक्षक जाळीच्या पट्ट्या सरकवून शॉर्टकट मार्ग अवलंबतात.परिसरातील ६१ व ६४ क्रमांकांचे रेल्वे गेट वर्दळीच्या रस्त्यांना जोडणारे आहेत.गाड्यांना मार्गस्थ करतेवेळी ते बंद असतात. या वेळी विद्यार्थी, महिला, चाकरमानी जीवाची पर्वा न करता रेल्वे रूळ ओलांडतात. कार्यरत रेल्वे अधिकारी, कर्मचारी बघ्याची भूमिका घेतात. नियम तोडणाऱ्यांवर त्यांचे कोणतेच नियंत्रण नाही. त्यामुळे अपघात घडून जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही. (वार्ताहर)