शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
2
Maharashtra SSC Result 2026 LIVE Updates: दहावीचा निकाल जाहीर! ९२.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण विभाग सर्वात अव्वल
3
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
4
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
5
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
6
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
7
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
8
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
9
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
10
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
11
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
12
Hantavirus: चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
13
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
14
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
15
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
16
बंगळुरूच्या जोडप्यानं श्रीलंकेहून पोहत गाठला भारत; १० तास ४५ मिनिटांत ३२ किलोमीटर अंतर कापलं
17
Viral Video: रस्त्याच्या कडेला पडलेल्या होत्या तीन बॅगा, आतमध्ये मिळाले २ कोटी ८३ लाख, पण...
18
Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २१३ आणि निफ्टी ९३ अंकांच्या घसरणीसह खुला
19
Chanakya Niti: गर्दीत तुमची 'छाप' पाडायचीय? मग चाणक्य नीतीचे हे १० नियम कधीच विसरू नका!
20
१० वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष; दुकानदाराकडून अत्याचाराचा प्रयत्न, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

सुटीचा रविवार गेला पाण्यात वाहून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 23:54 IST

रविवारी पहाटे ४ वाजल्यापासून विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट यांसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला.

पालघर : रविवारी पहाटे ४ वाजल्यापासून विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट यांसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे रस्त्यांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतूक बंद पडली. पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या. जिल्ह्यात आतापर्यंत ३३०० मिमी. पाऊस झाला असून एका नव्या विक्र माच्या दिशेने पावसाची दमदार वाटचाल सुरू आहे.
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून गणेशोत्सवाचे दहाही दिवस पावसातच गेले. मध्येच थोडी विश्रांती घेतली तरी पाऊस काही थांबत नाही. रविवारी पहाटेपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर काही भागात विद्युत पुरवठा खंडित झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पश्चिम रेल्वेच्या काही गाड्या थोड्या उशीराने धावत होत्या. तर मुंबईच्या दिशेने जाणाºया उदयपूर - बांद्रा एक्स्प्रेस या गाडीला वलसाड स्थानकात थांबवून परत माघारी पाठवण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
जिल्ह्यातील जवळपास २ ते ३ हजार बोटी समुद्रात
गणेशोत्सवानिमित्त घेतलेल्या विश्रांतीनंतर वसई, नायगाव, अर्नाळा, सातपाटी, एडवन, मुरबे, डहाणू आदी भागातील २ ते ३ हजार बोटी समुद्रात रवाना झाल्या आहेत. रविवार सकाळपासून वायरलेस सेटवरून या बोटींचा संपर्क होऊ शकत नसल्याचे कव-दालदा संघर्ष समितीचे अध्यक्ष जयप्रकाश मेहेर यांनी सांगितले. समुद्रात गेलेल्या बोटींमधील आपल्या नातेवाईकांशी संपर्क तुटल्याने त्यांच्या घरच्यांची काळजी वाढली आहे. घरातील वायरलेस सेटवरून त्यांच्याशी संपर्क साधून सर्व सुखरूप असल्याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न सतत सुरू आहे.
जिल्ह्यातील पावसाचा ३००० मिमी.चा टप्पा पार
पालघर जिल्ह्यात १४ सप्टेंबरपर्यंत ३३००.३८ मिमी. पावसाची नोंद झाली असून वसई ३१९४.१६ (१७८.९६ टक्के), वाडा ३७८३.४५ (१४७.८६), डहाणू २९७२.८५(१६३.२८), पालघर ३४१७.५८ (१९७.३८), जव्हार ३५५०.६१ (१०८.४१), मोखाडा ३३१९.६० (१५३.८८), तलासरी २७८३.५९ (१६३.३१), विक्रमगड ३३५८.७६ (१०४.७९) एकूण जिल्ह्यात १४४.७७ टक्के पावसाची नोंद.
>वसई-विरार पुन्हा जलमय
विरार : शनिवारी रात्री सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे पुन्हा नुकसान झाले. वसई - विरार येथे यंदा सलग सहाव्यांदा पाणी भरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सतत उद्भवणाºया पूरिस्थतीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
बोळिंज, विराट नगर, विवा कॉलेज रोड, अचोले, नालासोपारा पश्चिम, एव्हरशाईन रोड, इत्यादी ठिकाणी पाणी साचले होते. रविवारी पहाटे नागरिकांच्या घरात पाणी शिरू लागल्याने लोकांची धावपळ सुरु झाली.
पहाटे अचानक पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. गेल्या आठवड्यातच येथे पूरिस्थती निर्माण झाली होती. एकाच आठवड्यात पुन्हा अशी परिस्थिती आल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.
पाणी शिरल्याने घरातील सामानाचेच नाही तर नागरिकांच्या गाड्यांचेही भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे. पालिका प्रशासन यावर कसलीच ठोस उपाय योजना करत नसल्याने नागरिकांना सतत पुरिस्थतीचा सामना करावा लागत आहे.