शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

वसईतील बेणापट्टी समुद्रकिनारी मृतावस्थेत आढळला महाकाय व्हेल मासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 22:09 IST

Vasai News: हा महाकाय व्हेल मासा सुमारे 40 ते 50  फूट लांबीचा व 10 टन वजनी असून त्याची एकूणच अवस्था पाहता तो सुमारे 15 ते 20 दिवसापूर्वीच  त्याचा भर समुद्रात एखाद्या मोठया बोटीच्या धडकेने अथवा समुद्रातील सुरूंग स्फोटाने त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वाटतो आहे.

- आशिष राणे वसई  - पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्याच्या पश्चिम पट्ट्याला सुंदर व नयनरम्य समुद्रकिनारे लाभले आहेत त्यापैकीच एक अशा वसई गावांतील होळी- बेणापट्टी समुद्रकिनारी मंगळवार दि 21 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत भरतीच्या पाण्यासोबत वाहत आला आहे.हा महाकाय व्हेल मासा सुमारे 40 ते 50  फूट लांबीचा व 10 टन वजनी असून त्याची एकूणच अवस्था पाहता तो सुमारे 15 ते 20 दिवसापूर्वीच  त्याचा भर समुद्रात एखाद्या मोठया बोटीच्या धडकेने अथवा समुद्रातील सुरूंग स्फोटाने त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वाटतो आहे.त्यामुळे मंगळवारी अचानकपणे भरतीच्या पाण्यासोबत समुद्रलाटांनी दूरवरून तो वसईच्या होळी बेणापट्टी  समुद्रकिनारी फेकला गेला आहे.

दरम्यान बऱ्याच माहिन्यांनी वसई समुद्रकिनारी असा महाकाय व्हेल मासा कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर या महाकाय व्हेल माशाला पाहण्यासाठी वसईकर स्थानिक ग्रामस्थांनी व पर्यटकांनी प्रचंड मोठी गर्दी केली होती

या व्हेल माश्याची माहिती स्थानिक रहिवासी वेलकनीं डिसोझा व पायस अंकल यांनी लागलीच  वसई पोलीस, वसई विरार महापालिका प्रशासन व मत्स्य विभागाला देत सहकार्य केले. त्यामुळे आता मत्स्य व इतर यंत्रणाच्या  सहकाऱ्यांने पुढे या माशाची याच समुद्रकिनारी विल्हेवाट लावली जाईल असे ही समजते.अर्थातच येथील बेणापट्टी समुद्रकिनाऱ्यावर या माशाची लागलीच व्हिलेवाट लावणे गरजेचे आहे किंबहुना या माशाचा पाण्यात खूप दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याने व मासा पाण्याबाहेर आल्याने आता त्याची सर्वत्र हळूहळू दुर्गंधी पसरण्यास सुरुवात झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार