शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

घरे देत असल्याचे सांगून केली फसवणूक; जूचंद्र गावातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 00:11 IST

स्वस्तात घरे देत असल्याचे सांगून मुंबईतील विविध भागात राहणाऱ्या २०० ते २५० ग्राहकांना फसवल्याचे उघडकीस आले आहे.

नालासोपारा : नायगाव परिसरातील जूचंद्र गावात प्रधानमंत्री आवास योजनेतून स्वस्तात घरे देत असल्याचे सांगून मुंबईतील विविध भागात राहणाऱ्या २०० ते २५० ग्राहकांना फसवल्याचे उघडकीस आले आहे. घर पण नाही आणि घरासाठी दिलेले पैसे पण परत मिळाले नाहीत, यामुळे लाखो रुपये हडप करणाºया या बांधकाम व्यवसायिकांविरु द्ध फसवणूक झालेल्या ग्राहकांनी वालीव पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २४ लाखांचे घर १४ लाखांत देतो असे सांगून सन इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या कंपनीच्या सुरू असलेल्या इमारतीत मीरा रोड येथे राहणाºया रिठा शेठ (५२) यांनी आणि त्यांच्या पतीने २०१७ मध्ये ५५० चौरस फुटाच्या दोन सदनिका बुक केल्या होत्या. त्या बदल्यात २ लाख ८४ हजार १०० रु पये टोकन देण्यात आले होते.उर्वरित रक्कम सप्टेंबर २०१८ मध्ये सदनिकेचा ताबा देणार तेव्हा देण्याचे ठरले होते. याच इमारतीमध्ये मुंबईच्या वेगवेगळ्या परिसरात राहणाºया २०० ते २५० ग्राहकांनी सदनिका बुक केल्याचे कळते. या सर्व ग्राहकांचा व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुप असल्याचेही कळते.सदनिका देतो असे सांगून या सर्वांकडून लाखो रुपये कंपनीच्या भागीदार बांधकाम व्यवसायिकांनी घेतले. मात्र, अद्याप सदनिकेचा ताबा मिळाला नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. वालीव पोलिसांनी सन इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कंपनीच्या नासिर हमीद खान, अक्रम हमीद खान, धीरज सिंग, अब्दुल उर्फ खालीक शेख, आर्षि अब्दुल शेख, फारु ख खान या बांधकाम व्यवसायिकांवर गुन्हा दाखल केला आहे.स्वस्तात घरे मिळतात म्हणून लोक वसई तालुक्यात स्थलांतरित होतात. पण स्वस्तात घरे घेण्याच्या आणि मिळण्याच्या आमिषाला काहीजण बळी पडतात आणि त्यांची फसवणूक होते.२०० ते २५० ग्राहकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून स्वस्तात घरे देत असल्याचे खोटे सांगून फसवल्याचा गुन्हा दाखल करून तपासाला आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. बºयाच ग्राहकांची फसवणूक झाल्याचे प्रथम दर्शनी कळते आहे.- विलास चौगुले (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे)

टॅग्स :Homeघर