घरे देत असल्याचे सांगून केली फसवणूक; जूचंद्र गावातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 12:00 AM2019-10-09T00:00:22+5:302019-10-09T00:11:56+5:30

स्वस्तात घरे देत असल्याचे सांगून मुंबईतील विविध भागात राहणाऱ्या २०० ते २५० ग्राहकांना फसवल्याचे उघडकीस आले आहे.

Fraud by stating that houses were being provided; Events in the village of Juchandra | घरे देत असल्याचे सांगून केली फसवणूक; जूचंद्र गावातील घटना

घरे देत असल्याचे सांगून केली फसवणूक; जूचंद्र गावातील घटना

Next

नालासोपारा : नायगाव परिसरातील जूचंद्र गावात प्रधानमंत्री आवास योजनेतून स्वस्तात घरे देत असल्याचे सांगून मुंबईतील विविध भागात राहणाऱ्या २०० ते २५० ग्राहकांना फसवल्याचे उघडकीस आले आहे. घर पण नाही आणि घरासाठी दिलेले पैसे पण परत मिळाले नाहीत, यामुळे लाखो रुपये हडप करणाºया या बांधकाम व्यवसायिकांविरु द्ध फसवणूक झालेल्या ग्राहकांनी वालीव पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २४ लाखांचे घर १४ लाखांत देतो असे सांगून सन इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या कंपनीच्या सुरू असलेल्या इमारतीत मीरा रोड येथे राहणाºया रिठा शेठ (५२) यांनी आणि त्यांच्या पतीने २०१७ मध्ये ५५० चौरस फुटाच्या दोन सदनिका बुक केल्या होत्या. त्या बदल्यात २ लाख ८४ हजार १०० रु पये टोकन देण्यात आले होते.
उर्वरित रक्कम सप्टेंबर २०१८ मध्ये सदनिकेचा ताबा देणार तेव्हा देण्याचे ठरले होते. याच इमारतीमध्ये मुंबईच्या वेगवेगळ्या परिसरात राहणाºया २०० ते २५० ग्राहकांनी सदनिका बुक केल्याचे कळते. या सर्व ग्राहकांचा व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुप असल्याचेही कळते.
सदनिका देतो असे सांगून या सर्वांकडून लाखो रुपये कंपनीच्या भागीदार बांधकाम व्यवसायिकांनी घेतले. मात्र, अद्याप सदनिकेचा ताबा मिळाला नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. वालीव पोलिसांनी सन इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कंपनीच्या नासिर हमीद खान, अक्रम हमीद खान, धीरज सिंग, अब्दुल उर्फ खालीक शेख, आर्षि अब्दुल शेख, फारु ख खान या बांधकाम व्यवसायिकांवर गुन्हा दाखल केला आहे.
स्वस्तात घरे मिळतात म्हणून लोक वसई तालुक्यात स्थलांतरित होतात. पण स्वस्तात घरे घेण्याच्या आणि मिळण्याच्या आमिषाला काही
जण बळी पडतात आणि त्यांची फसवणूक होते.

२०० ते २५० ग्राहकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून स्वस्तात घरे देत असल्याचे खोटे सांगून फसवल्याचा गुन्हा दाखल करून तपासाला आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. बºयाच ग्राहकांची फसवणूक झाल्याचे प्रथम दर्शनी कळते आहे.
- विलास चौगुले (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे)

Web Title: Fraud by stating that houses were being provided; Events in the village of Juchandra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Homeघर