केळवे बीचवर चार तरुण बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 06:47 IST2018-06-18T06:47:32+5:302018-06-18T06:47:32+5:30

केळवे बीचवर रविवारी सकाळी ११ वाजता नालासोपाऱ्याचे ४ तरुण बुडाले, तिघांना वाचविण्यात यश आले.

Four young drowned on Kelve beach | केळवे बीचवर चार तरुण बुडाले

केळवे बीचवर चार तरुण बुडाले

पालघर : केळवे बीचवर रविवारी सकाळी ११ वाजता नालासोपाऱ्याचे ४ तरुण बुडाले, तिघांना वाचविण्यात यश आले. एकाचा मृतदेह सापडला असून इतरांचा शोध सुरू आहे. ७ तरुणांचा गट केळवे-दादरा पाडा येथे धोकादायक खाडीवर गेला होता. फलकाकडे दुर्लक्ष करत त्यातील काही जण समुद्रात पोहण्यासाठी गेले होते.
दीपक परशुराम चालवादी (१७) याचा मृतदेह सापडला असून दीपेश पेडणेकर, श्रीतेज चिपटे आणि तुषार चिपटे हे बेपत्ता झाले आहेत. गौरव सावंत, संकेत जोगळे, देविदास जाधव यांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले. उसळणा-या लाटांमध्ये पोहत असताना ते खाडीच्या प्रवाहात ओढले गेले. त्यांनी किना-यावरील मित्रांना मदतीसाठी हाका मारल्या. दीपक चालवादी त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र, तोही पाण्यात ओढला गेला. मात्र किना-यावर जीवरक्षक नव्हता. स्थानिक सात ते आठ तरुणांनी दीपक यास बाहेर काढले. माहीमच्या प्राथमिक रुग्णालयात त्याचे निधन झाले. जिल्हास्तरीय आपत्कालीन यंत्रणेचे कर्मचारी घटनास्थळी आले नव्हते, असे स्थानिकांनी सांगितले.

Web Title: Four young drowned on Kelve beach