शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडमधील शेतकरी वळतोय भाजीपाला पिकांकडे

By admin | Updated: January 5, 2016 00:52 IST

पारंपरिक भात व नाचणीच्या शेतीने वारंवार दगा दिल्यानंतर विक्रमगड तालुक्यातील बळीराजा आता हिवाळ्यातील रब्बी हंगामाकडे वळला आहे.

तलवाडा : पारंपरिक भात व नाचणीच्या शेतीने वारंवार दगा दिल्यानंतर विक्रमगड तालुक्यातील बळीराजा आता हिवाळ्यातील रब्बी हंगामाकडे वळला आहे. काहींनी वीटभट्टी व्यवसाय किंवा शहराकडे जाऊन मोलमजुरीचा मार्ग निवडला असला तरी काही गावांमध्ये भाजीपाला लावल्याचे दिसत आहे.पावसाळ्यात पेरणी, भाताची लावणी व अन्य मशागतीची कामे करून भातकापणी आटोपली की, पुन्हा त्यांचे डोळे खरीप हंगामाकडे लागलेले असायचे़ कारण, खरीप हंगामच त्याला जीवाभावाची साथ होती़ मात्र, अलीकडच्या दोन-चार वर्षांत शेतकरी थोडा आधुनिकतेच्या जगात वावरू लागला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांप्रमाणेच पाण्याची योग्य अशी सोय असलेल्या शेतात हिवाळी हंगामात पालेभाज्या घेण्यात येत आहे. ़विहीर, नदी, नाले यातील पाण्याचे उपलब्ध स्रोत या पालेभाज्या पिकविण्यासाठी संजीवनी ठरत आहे़ पालेभाज्यांसाठी साखळी पद्धतीने नळाद्वारे, पाटाने किंवा विद्युत मोटारीने पिकांना पाणी पुरविले जात आहे़ त्यामुळे मळ्यावर काम करणाऱ्या स्त्री-पुरुषांना मजुरीही अर्थार्जनाचा चांगला लाभ होऊ लागला आहे़ दुसरीकडे तयार झालेली ताजी भाजी शहरापर्यंत पोहोचू लागली आहे़ दूरवरून येणाऱ्या भाज्यांपेक्षा या गावठी भाज्यांना मागणीही चांगली वाढली आहे, असे येथील शेतकऱ्यांना सांगितले जाते़ (वार्ताहर) हाताला पैसा मिळू लागला...विक्रमगड तालुक्यातील, कावळे, शेलपाडा, विक्रमगड, माण, नागझरी, वसुरी, डोल्हारी, दादडे, तलवाडा, आंबिवली, कुंर्झे आदी भाग परिसरातून मोठ्या प्रमाणात रब्बी पीक घेतले जाते़ येथील मोकळ्या किंवा थोड्या अधिक जमिनीत कारली, दुधी, मिरची, गवार, वांगी, टोमॅटो, कोबी, फलॉवर, भेंडी, सिमला मिरची, चवळी, काकडी, माठ, भोपळा, मेथी, चवळी अशा विविध पालेभाज्या घेऊन त्या विक्रीसाठी तालुक्याच्या ठिकाणी मुख्य बाजारात किंवा गावातच विकल्या जाऊ लागल्या आहेत.