शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी नवे प्रयोग करावेत - सवरा

By admin | Updated: April 24, 2016 02:04 IST

पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती हाच असल्यामुळे त्यांनी चांगल्या उत्पादनासाठी व आपला आर्थिकस्तर उंचावण्यासाठी शेतीमध्ये वेगवेगळे नावीन्यपूर्ण प्रयोग

वाडा : पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती हाच असल्यामुळे त्यांनी चांगल्या उत्पादनासाठी व आपला आर्थिकस्तर उंचावण्यासाठी शेतीमध्ये वेगवेगळे नावीन्यपूर्ण प्रयोग करावेत. असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी केले. दि. १४ ते २४ एप्रिल २०१६ या कालावधीत ‘ग्राम उदय से भारत उदय’ अभियान जिल्हयामध्ये राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत वाडा तालुक्यातील सांगे या गावात गुरुवारी ग्राम किसान सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी केवळ भातशेतीवर अवलंबून न राहता बहुपीक घेण्याची मानसिकता ठेवली पाहिजे तसेच नवे तंत्र आणि मंत्र याचा वापर केला पाहिजे. असे सांगून पालघर जिल्हयाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. जिल्ह्यातील रस्ते, पूल,बंधारे, शेततळे यांची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. वसई - झाई समुद्र किनारा विकसीत करण्याचे नियोजन असून त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल व रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. या कार्यक्रमात कृषीभूषण अनिल पाटील, आशाबाई पाटील, नारायण ठाकरे, प्रीती ठाकर,अजय भदाणे यांना उत्कृष्ट आंबा निर्यातीबद्दल प्रमाणपत्र देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच या कार्यक्रमात विष्णू पष्टे, रोहिदास गायकर, कान्हा हरड, अरूण पष्टे, लडकू गायकर, गुलाब भादे, अश्विनी पाटील, बबन शेलार दया कुवरा यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पॉवर टिलर वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किसान ग्रामसभा घेण्यात येणार आहेत. या सभांमधून गावकऱ्यांना ग्राम आणि कृषी विकासाच्या योजनांची माहिती तर देण्यात येणार आहे. (वार्ताहर) प्रभातफेरी, स्वच्छता मोहिम, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांनी गावांमध्ये वातावरण निर्मिती केली जाईल. ग्रामसभेत राष्ट्रीय पंचायत राज दिवसाच्या निमित्ताने उपस्थितांकडून शपथ घेण्यात येईल. २४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता पंतप्रधानांचे भाषण दूरचित्रवाणी आणि आकाशवाणी वरून प्रसारित केले जाणार आहे. ते ही सर्वांनी ऐकावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे यांनी केले आहे. कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. जी. पाटील, तालुका कृषी अधिकारी वारे, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.