शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : दुबईवरून आलेले ‘ते’ सहा जण देखरेखीखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 00:37 IST

दहा दिवसांपूर्वी दुबई येथे फिरण्यासाठी गेलेले सहा पालघरवासीय नागरिक शहरात आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेला समजताच डॉ. सागर पाटील, आरोग्य सेवक, सहाय्यक डॉक्टर यांच्या पथकाने शुक्रवारपासून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.

पालघर : पालघर शहरात दहा दिवसांपूर्वी दुबईवरून आलेल्या एकूण सहा नागरिकांचा शोध घेण्यात आरोग्य यंत्रणेला आज उशिराने यश आले असून त्यांची तपासणी करून त्यांना आपल्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्यामध्ये ताप, खोकला, सर्दीसारखी लक्षणे आढळली असून, त्यांच्या रक्ताचे नमुने उद्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.दहा दिवसांपूर्वी दुबई येथे फिरण्यासाठी गेलेले सहा पालघरवासीय नागरिक शहरात आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेला समजताच डॉ. सागर पाटील, आरोग्य सेवक, सहाय्यक डॉक्टर यांच्या पथकाने शुक्रवारपासून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. डॉ. पाटकर गल्लीत त्यातील एक व्यक्ती सापडल्यानंतर त्यांच्या तपासणीत कोरोनाबाबत कुठलीही लक्षणे आढळून आली नव्हती. त्यांच्या घरातील अन्य सर्व लोकांची तपासणी या वेळी आरोग्य विभागाकडून करण्यात आली. त्या व्यक्तीसोबत अन्य ६ ते ७ लोक दुबईवरून पालघरमध्ये आल्याची माहिती कळल्यानंतर त्यांचा पत्ता माहीत नसल्याने त्यांचा शोध घेत त्यांच्या तपासणीचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर उभे राहिले होते. शेवटी डॉ. सागर पाटील आणि त्यांच्या पथकाने दुबईवरून आलेल्या अन्य पाच लोकांचा शोध घेण्यास यश मिळविले. त्यांच्या तपासणीदरम्यान त्यांच्यात ताप, खोकला, सर्दी आदी लक्षणे आढळून आली असून त्यांच्या रक्ताचे नमुने ग्रामीण रुग्णालयात घेऊन ते तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात येणार आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांना कोरोना विषाणूची लागण झाले की नाही हे नक्की होईल, असे डॉक्टरांनी सांगितले.जिल्ह्यातून वाडा येथील दोन रुग्णांपैकी एका रुग्णाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यांच्यात कोरोना विषाणूची कुठलीही लक्षणे दिसून आली नसल्याचा (निगेटिव्ह) अहवाल प्राप्त झाल्याने आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निश्वास टाकल्याची माहिती डॉ.पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवरून काम करीत असून डोळ्यात तेल घालून परदेशातून आलेल्या व्यक्तीवर लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे देशात आलेले परदेशी नागरिक आणि स्थानिक लोकांनी याची माहिती न लपविता आरोग्य यंत्रणेला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवरून काम करीत असून डोळ्यात तेल घालून परदेशातून आलेल्या व्यक्तीवर लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे देशात आलेले परदेशी नागरिक आणि स्थानिक लोकांनी याची माहिती न लपविता आरोग्य यंत्रणेला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाpalgharपालघर