वसई विरार शहरात सफाई कामगारांकडून हाताने मैला स्वच्छ करून घेण्यासाठी पूर्ण बंदी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 04:00 PM2021-09-28T16:00:29+5:302021-09-28T16:01:18+5:30

तक्रारी आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणार, महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे आदेश

complete ban on cleaning hands by scavengers in Vasai Virar city | वसई विरार शहरात सफाई कामगारांकडून हाताने मैला स्वच्छ करून घेण्यासाठी पूर्ण बंदी!

वसई विरार शहरात सफाई कामगारांकडून हाताने मैला स्वच्छ करून घेण्यासाठी पूर्ण बंदी!

googlenewsNext

आशिष राणे, लोकमत न्यूज नेटवर्क

वसई:वसई विरार शहरात सफाई कामगारांकडून कुठल्याही नागरिकांच्या स्वतः ची संकुले, इमारती किंवा वाणिज्य आदी ठिकाणची त्यांच्या हाताने मैला व मल :जल स्वच्छ करण्यासाठी शासनाने पूर्णपणे बंदी घातली असून या संदर्भात शहरात कुठेही तसे आढळुन आल्यास अथवा महापालिका प्रशासनाकडे तश्या तक्रारी आल्यास संबंधितावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे आदेश आता वसई विरार शहर महापालिकेच्या  घनकचरा व्यवस्थापन विभागाने काढले असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी लोकमत ला दिली.

राज्य शासनाच्या सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज या कार्यक्रमाअंतर्गत शहरांतील  नागरिकांना इशारा देत  हाताने मैला व मलःजल वाहिन्या (भुयारी गटार) सफाई करणेबाबत शासनाने पूर्णतः बंदी आणली आहे. त्यामुळे शहरातील कोणत्याही नागरिकांनी त्यांच्या इमारतीच्या, घराच्या किंवा वाणिज्य इमारतीच्या मैला टाकी (सेप्टि टॅंक) सफाई करणेकरिता कोणत्याही खाजगी सफाई कामगारांकडून मानवीय रित्या सफाई करून घेऊन मैला टाकी यांची मानवीयरित्या सफाई करणे धोकादायक आहे.

यामुळे संबंधित कामगाराचे प्राण जाऊ शकतात. म्हणूनच अशा प्रकारचे काम करताना कोणी आढळल्यास संबंधित काम करून घेणाऱ्या तसे काम करणाऱ्या नागरिक अथवा संस्था,संघटना यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. ‘असे महापालिका प्रशासनाने म्हंटलं आहे
दरम्यान हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुर्नवसन अधिनियम, २०१३’ या कायद्यान्वये पहिल्यांदा गुन्हा केल्यास २ वर्षांपर्यंत तुरुंगवास अथवा २ लाख रुपये दंड अथवा दोन्हीही शिक्षा संबंधित गुन्हेगारास होऊ शकते. 

तसेच सदर गुन्हा पुन्हा घडल्यास संबंधितावर ५ वर्षापर्यंत तुरुंगवास अथवा ५ लाख रुपये दंड अथवा दोन्हीही शिक्षा होऊ शकते. तसेच मानवीय रित्या मैला टाकीची सफाई करून घेताना कोणतीही जीवित हानी झाल्यास संबंधित मृत सफाई कामगाराच्या कुटुंबाला १० लाख नुकसान भरपाई द्यावी लागेल.

गुन्हे टाळा व यांत्रिक पद्धतीने टाकी स्वच्छ करा

सदर बाब गंभीर असून संबंधित होणारा अपाय टाळण्यासाठी वसई - विरार शहर महानगरपालिकेद्वारे मैला टाकी यांची यांत्रिकी पद्धतीने सफाई करण्यासाठी प्रत्येक प्रभागात १ या प्रमाणे ९ मैला गाड्या (सक्शन मशिन) कार्यरत केलेल्या आहेत. तसेच मलःजल वाहिन्या (भुयारी गटार) साफ करणेसाठी सक्शन कम जेटींग मशीनचा वापर केला जात आहे. 

नागरिकांच्या तक्रारी नोंदविणे व निराकरण करणेकरिता  महानगरपालिकेने विविध माध्यम उपलब्ध केलेले आहेत. यामध्ये ‘१४४२०’ ही टोल फ्री हेल्प लाईन सेवा सुरु करण्यात आलेली आहे. तसेच ८४४६६२२२८० या व्हॉट्सअॅप क्रमांकावर नागरिक तक्रार नोंदवू शकतात. महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट https://vvcmc.in व V-click अॅप वर तक्रार नोंदवू शकतात. तसेच केंद्र शासनाच्या MoHUA Swachhta App वर तक्रार नोंदवू शकतात. सदर तक्रारीचे निराकरण करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वतंत्र दल स्थापित केलेले आहे. तसेच या संपुर्ण कार्यप्रणाली वर नियंत्रण ठेवण्यासाठी (ERSU) स्वछता शिघ्रकृती दलाची स्थापना मनपाद्वारे केली आहे.

नागरिकांनी काय करावे व काय करु नये (Do’s and Don’ts) याची माहिती खालीलप्रमाणे.

१. मैला टाकी व भुयारी गटारांच्या तक्रार नोंदविण्यासाठी १४४२० या टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा. अथवा https://vvcmc.in या अधिकृत वेबसाईट/ V-click App/ MoHUA Swachhta App वर तक्रार नोंदवावी. 

२. मैला टाकी आणि भुयारी गटारांची सफाई मनपाद्वारे किंवा मनपाने अधिकृत केलेल्या सफाई पुरवठादारा कडून करून घ्यावी.

३. दर ३ वर्षातून एकदा मैला टाकी ची सफाई करणे बंधनकारक आहे.

४. मैला टाकी आणि भुयारी गटारांची सफाई अनधिकृत पुरवठादाराकडून करून घेऊ नये. तसेच मानवीय (अयांत्रिकी) पद्धतीने सफाई करून घेऊ नये. असे केल्यास प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष काम करणारे अथवा करून घेणारे यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. असे ही महापालिका प्रशासनाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे.
 

Web Title: complete ban on cleaning hands by scavengers in Vasai Virar city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.