शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

महिला शिवसैनिकांकडून नायजेरियन महिलेचे बाळंतपण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 15:51 IST

गेल्या दीड दोन वर्षांपासून गिफ्ट नावाची ३० वर्षीय नायजेरियन तरुणी भटकत असते. तिच्यावर मानसिक परिणाम झाल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

- धीरज परब 

मीरारोड - मीरारोडच्या हटकेश भागात शिवसेनेच्या महिला आघाडीने रविवारी सायंकाळी सार्वजनिक ठिकाणी प्रसूती वेदनेने विव्हळत पडलेल्या एका नायजेरियन तरुणीचे बाळंतपण सुखरूप केले. 

मीरारोडच्या हाटकेश भागात नायजेरियन नागरिकांच्या उच्छाद आणि गैरप्रकारांविरोधात शिवसेनेचे स्थानिक शाखा प्रमुख महेश शिंदे सह शिवसैनिक व स्थानिक नागरिकांनी गेल्या काही वर्षांपासून सतत तक्रारी - आंदोलने केली आहेत. परिणामी, या परिसरात नायजेरियन नागरिकांचे चालणारे गैरप्रकार कमी झाले आहेत. परंतु या भागात गेल्या दीड दोन वर्षांपासून गिफ्ट नावाची ३० वर्षीय नायजेरियन तरुणी भटकत असते. तिच्यावर मानसिक परिणाम झाल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यातच सदर तरुणी गरोदर राहिली. 

रविवारी सायंकाळी ती हाटकेशमधील मंगलनगर येथील पालिका मंडईच्या प्रवेश द्वारावर अर्धनग्न अवस्थेत प्रसूती वेदनांनी विव्हळत पडली होती. तिला प्रसूती वेदनेने विव्हळताना पाहून शिवसेनेच्या महिला शाखा संघटक छाया कापडणेकर यांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यांच्या सोबत विमल ठेंगे, ईस्टर नाडार सुद्धा होत्या. बाळाचे डोके किंचितसे बाहेर आलेले पाहून त्यांनी लगेच तिला मंडईच्या आत घेऊन प्रवेशद्वार लावले. तेथील गोणी आदींच्या सहाय्याने पडदा तयार केला. त्यावेळी तेथील अन्य काही महिला देखील मदतीला आल्या. नायजेरियन महिलेला धीर देत तिचे बाळंतपण या महिलांनी सुखरूप केले. नजीकच असलेल्या एका रुग्णालयातील परिचारिकेला बोलावून आई व बाळाची नाळ वेगळी केली. 

यादरम्यान शाखा प्रमुख महेश शिंदे यांनी पालिकेची रुग्णवाहिका आणि पोलिसांना कळवले. पालिकेची रुग्णवाहिका आली त्यातून तिला मीरारोडच्या भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालयात नेण्यात आले. सदर नायजेरियन महिला आणि तिची नवजात मुलगी सुखरूप असून बाळाचे वजन देखील ३ किलो पेक्षा जास्त असल्याचे  कापडणेकर म्हणाल्या. 

परदेशी तरुणी अत्याचाराची शिकार? सदर तरुणी ही परिसरात भटकत असे. तिला मानसिक आजार असल्याने याचा गैरफायदा घेऊन कोणीतरी तिच्यावर अतिप्रसंग केल्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून सदर परदेशी महिलेस न्याय मिळवून देण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.  

टॅग्स :mira roadमीरा रोड