प्रेयसीला भिंतीत चिणून मारले, आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 02:51 AM2021-01-16T02:51:27+5:302021-01-16T02:51:58+5:30

वाणगाव येथील घटना; आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली 

The accused confessed to the crime by hitting his girlfriend on the wall | प्रेयसीला भिंतीत चिणून मारले, आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली 

प्रेयसीला भिंतीत चिणून मारले, आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बोर्डी : वाणगाव येथील वृंदावन सदनिकेतल्या एका फ्लॅटच्या भिंतीत अमिता मोहिते (३२) या तरुणीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आहे. प्रेम प्रकरणातून ३० वर्षीय आरोपी प्रियकर सूरज घरत (रा. बोईसर, सरावली) याने तिची हत्या केल्याची कबुली पोलीस तपासात दिली असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

प्रेमविवाहासाठी घरातून पळून गेलेल्या एका बेपत्ता तरुणीचा शोध घेत असताना ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. मागील चार महिन्यांपूर्वी उमरोळी येथील अमिता मोहिते या तरुणीने प्रियकरासोबत प्रेमविवाह करण्यासाठी कोणालाही न सांगता घर सोडले होते. या काळात तरुणीचा प्रियकर तिच्या व्हाॅट्सॲप अकाउंटद्वारे तरुणीच्या कुटुंबीयांशी त्यांची मुलगीच असल्याचे भासवून संपर्कात होता. तरुणीच्या कुटुंबीयांना संशय आल्याने त्यांनी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. लग्नाचा तगादा लावल्याने तिची हत्या केल्याची कबुली प्रियकराने पोलिसांना दिली. वाणगाव येथील भाडोत्री फ्लॅटच्या भिंतीत तरुणीचा मृतदेह ठेवून स्वतःच भिंतीचे बांधकाम केले होते. तो त्याच फ्लॅटमध्ये चार महिन्यांपासून राहत होता. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

लग्नाचा तगादा लावल्याने केली हत्या 
अमिताच्या कुटुंबीयांनी त्यानंतर बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा खोलात तपास केल्यानंतर आणि तिच्या प्रियकराचा शोध घेतल्यानंतर तरुणीने लग्नाचा तगादा लावल्याने तिची हत्या केल्याची कबुली प्रियकराने पोलिसांना दिली आहे. आरोपी सूरज याने वाणगाव येथील भाडोत्री फ्लॅटच्या भिंतीत तरुणीचा मृतदेह ठेवून स्वतःच भिंतीचे बांधकाम केले होते. तो त्याच फ्लॅटमध्ये चार महिन्यांपासून राहत होता. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. 

 

Web Title: The accused confessed to the crime by hitting his girlfriend on the wall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.