शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत शाळांना मान्यता द्या - मोते

By admin | Updated: April 5, 2016 01:10 IST

पालघर जिल्ह्यातील अनधिकृत ठरविण्यात आलेल्या शाळा बंद केल्यास शाळाबाह्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढेल त्याकरीता त्या शाळांच्या मान्यतेसाठी शिक्षणमंत्र्यांशी

बोईसर : पालघर जिल्ह्यातील अनधिकृत ठरविण्यात आलेल्या शाळा बंद केल्यास शाळाबाह्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढेल त्याकरीता त्या शाळांच्या मान्यतेसाठी शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करून विशेष प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शिक्षक आमदार रामनाथ (दादा) मोते यांनी बावीस शाळांच्या संस्थाचालकांसोबत घेतलेल्या बैठकीत दिले.शिक्षण विभागाने पालघर जिल्ह्यातील २२ अनधिकृत शाळा बंद करण्याचे आदेश देऊन एक लाख रू. दंड व शाळा बंद न केल्यास प्रतिदिवशी दहा हजार रू. दंडाची शिक्षा दिली होती. या धर्तीवर आमदार मोते यांनी परिक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असून या शाळांनी मान्यतेसाठी प्रस्ताव शासनाकडे सादर केलेले आहेत असे शिक्षणमंत्र्यांच्या निदर्शनास आणून त्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली होती.संस्था चालकांच्या बैठकीत आमदार मोते यांनी मी खंबीरपणे पाठीशी असल्याचे सांगितले. तर पंचतत्व सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर राऊळ यांनी हा लढा म्हणजे ग्रामीण व आदिवासी भागातील शिक्षणापसून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असून संस्थाचालकांच्या बरोबर आ. मोते असल्याने या लढ्याला नक्की यश मिळेल असा आशावाद व्यक्त केला. या बैठकीस जी. के. पष्टे, संकपाळ सर, संतोष पावडे, चौधरी सर, शेख सर, यांच्यासह बावीस शाळांचे संस्थाचालक, सचिव, मुख्याध्यापक व शिक्षकवर्ग उपस्थित होते सदर कार्यक्रमासाठी समन्वयकाची भुमीका मुख्याध्यापक सुशिल शेजुळ यांनी पार पाडली.