शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

वसईमध्ये 4.8 एफएसआयमुळे शहर विकासाला मिळणार चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 00:36 IST

सामान्यांना दिलासा : एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली लागू  

आशीष राणेलोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसईतील नागरिकांना व विकासकांना नव्या विकास नियंत्रण नियमावलीची मागील ४ वर्षें प्रतीक्षा होती, ती प्रतीक्षा अखेर संपली आहे. वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात आता सर्वाधिक ४.८ एफएसआय मंजूर झालेला असून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांचाही मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाने याआधीच मंजूर केलेली एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली नुकतीच लागू करण्यात आली असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या नगररचना विभागाचे प्रमुख संचालक वाय.एस. रेड्डी यांनी ‘लोकमत’ला दिली.

वसई-विरार शहरात एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली लागू करण्यात आल्याने आता शहरातील बांधकामासाठी तिप्पट वाढीव चटई क्षेत्रफळ मंजूर करण्यात आले आहे. या नव्या विकास नियंत्रण नियमावलीमुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणारी स्वस्त घरे व त्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र या नवीन एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीत वसईतील हरितपट्ट्याबाबत विशेष काळजी घेत त्यास कुठेही धक्का न लावता पूर्णतः संरक्षित ठेवण्यात आली आहे. स्वस्त घरे, वाणिज्य, उद्योग आणि पर्यटन आदी क्षेत्राला चालना मिळणाऱ्या तरतुदी या नव्या नियमावलीत करण्यात आल्या आहेत. याखेरीज वसई-विरार शहरात झोपडपट्टी पुनर्विकास योजनाही अंमलात येणार आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबई वगळता संपूर्ण राज्यात एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली असावी यासाठी राज्याच्या नगरविकास खात्याने भाजप-शिवसेना युती शासनाच्या काळात तत्कालीन प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने हा आराखडा तयार करून २८ फेब्रुवारी २०१७ रोजी प्रसिद्ध केला होता. त्यावर हरकती व  सूचना मागविल्यानंतर तो पुन्हा अंतिमतः प्रसिद्ध करण्यात आला आहे.

वसई-विरार महापालिकेनेही नवीन एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली लागू केल्याने  वसई-विरार शहरांच्या विकासाला गती व चालना मिळेल. सोबत  प्रीमियममध्ये जरी कपात केली असली तरी एफएसआय तिप्पट झाल्याने बांधकामे वाढून सर्वसामान्यांना स्वस्तात घरे मिळतील. एसआरए योजना, उत्तम दर्जाचे उद्योगधंदे व  पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल.- वाय.एस. रेड्डी, प्रमुख संचालक, नगररचना विभाग, वसई-विरार शहर महानगरपालिका