शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

जव्हार अर्बनच्या १७ जागांसाठी ३५ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2015 23:31 IST

जव्हार तालुक्यासह पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात व पाच तालुक्यांत अग्रगण्य असलेल्या दी जव्हार अर्बन को-आॅप. बँकेच्या निवडणुकीसाठीचे मतदान २९ जुलै रोजी होणार आहे.

जव्हार : जव्हार तालुक्यासह पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात व पाच तालुक्यांत अग्रगण्य असलेल्या दी जव्हार अर्बन को-आॅप. बँकेच्या निवडणुकीसाठीचे मतदान २९ जुलै रोजी होणार आहे. त्या निवडणुकीसाठी एकूण ७० उमेदवारी अर्ज वैध ठरले. यापैकी किती उमेदवार व पॅनल उभे राहणार, याबाबत जिल्ह्यात प्रचंड उत्सुकता होती. १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख होती. त्या दिवशी तब्बल ३५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे बँकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होऊन १७ संचालकपदांसाठीच्या निवडणुकीत तब्बल ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत.या निवडणुकीसाठी शिवसेना तसेच मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने युती करून शिवनेरी पॅनल स्थापन करून १७ पैकी १७ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १७ पैकी १६ जागांवर उमेदवार जाहीर केले, तर दोन अपक्ष उमेदवारदेखील रिंगणात असल्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.दी जव्हार अर्बन बँकेच्या जव्हार, मोखाडा, विक्रमगड, कुडूस, मनोर व बोईसर अशा सहा शाखा असून ११,००० च्या आसपास मतदार, सभासद आहेत. या निवडणुकीसाठी सहकार विभागाने जव्हार ८, मोखाडा २, खोडाळा १, विक्रमगड ४, वाडा १, कुडूस २ व मनोर येथे ३ अशी २१ मतदान केंदे्र तयार केली असून त्या त्या भागातील सभासद मतदार त्या केंद्रावर दि. २९ जुलै रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान करू शकतात, अशी माहिती निवडणूक पीठासीन अधिकाऱ्यांनी दिली. (वार्ताहर)