शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

१३२ के.व्ही. सब स्टेशन कधी सुरु होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:20 IST

दिनेश भट : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मागणी; हायटेंशन वायरचे काम पूर्ण होणे बाकी

जव्हार : जव्हार - जामसर रोडवर १३२/३३ के.व्ही.चा वीज पुरवठा सब स्टेशन मंजूर करण्यात आले असून, बोराळा येथे सब स्टेशनचे काम वर्षभरात पूर्ण झाले आहे. मात्र हायटेंशन वायरचे काम अपूर्ण असल्याने हे सबस्टेशन तयार होऊनही सुरु झाले नसल्याने जव्हार आणि मोखाडाकरांवर त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. हे हायटेेंशन वायरचे काम पूर्ण कधी होणार? अशी विचारणा नियोजन समितीच्या बैठकीत करण्यात आली.

पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्र मगड या ग्रामीण आदिवासी भागात नेहमीच अनियमित विद्युत पुरवठा होत असून, दिवसभरातून दोन ते तीन वेळा लोडशेडिंगचा सामना करावा लागतो. बोराळा येथील १३२/३३ के.व्ही सब स्टेशनमुळे या समस्यांमधून ग्रामीण आदिवासी भाग लवकरच सुटेल, असे वाटत होते. मात्र, काम पूर्ण होऊन वर्ष झाले. तरीही ओव्हरहेड, हायटेंशन वायरचे काम अपूर्ण असून हे हाय पॉवरचे काम पूर्ण कधी होणार? अशी विचारणा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिनेश भट यांनी नियोजन समितीच्या बैठकीत केली आहे.

या उपकेंद्राचे काम महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीला देण्यात आले आहे. बोराळे येथील हाय पॉवरच्या सबस्टेशन वरून चालतवड, खोडाळा, झडपोली या तीन ठिकाणी उपकेंद्र मंजूर आहेत. तसेच बोराला उपकेंद्राचे पूर्ण झाले असून, हायटेंशन वायरचे कामे कधी पूर्ण होणार? आदिवासी भागातील विद्युतची समस्या सुटणार कधी? असा संतप्त सवाल येथील आदिवासी बांधव करीत आहेत. यावेळी या १३२/३३ के. व्ही. विद्युत उपकेंद्राचे काम वर्षभरात पूर्ण करणार असल्याचे महापारेषण कंपनीच्या संचालकांनी सांगितले होते. काम तर पूर्ण झाले मात्र हायटेंशन वायर काम अद्याप चालू झालेले नाहीत.डी.पी.सी. मध्ये मागणी केली असून हे काम लवकर झाले नाही तर आम्ही शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडू.- दिनेश भट,जिल्हा नियोजन समिती सदस्यमहावितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे जव्हार मोखाड्याला नेहमीच वीज खंडित होत आहे. इतका मोठा खर्च करून बोराला येथे सबस्टेशन केंद्राची उभारणी झाली. मात्र टॉवर लाईनचे काम अद्याप सुरु करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वितरण विभागाल कामाचे गांभीर्य नाही. कामे तातडीने करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.- सुनील भुसारा, अध्यक्ष,राष्ट्रवादी पालघर जिल्हा

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर