जि.प. शिक्षकांचे ‘आंबील खाओ आंदोलन’

By Admin | Updated: April 21, 2016 02:26 IST2016-04-21T02:26:58+5:302016-04-21T02:26:58+5:30

जि.प. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शिक्षकांचे वेतन रखडले. शिक्षकांसमोर आर्थिक समस्या निर्माण झाली.

Zip Teachers 'Aambil Khao Movement' | जि.प. शिक्षकांचे ‘आंबील खाओ आंदोलन’

जि.प. शिक्षकांचे ‘आंबील खाओ आंदोलन’

वेतन रखडले : प्रशासनाच्या दिरंगाईचा निषेध
समुद्रपूर : जि.प. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शिक्षकांचे वेतन रखडले. शिक्षकांसमोर आर्थिक समस्या निर्माण झाली. यामुळे अनेक महत्त्वाचे व्यवहार प्रभावीत होत आहे. या दिरंगाईचा निषेध म्हणून राज्य प्राथमिक शिक्षक संघ व जुनी पेन्शन हक्क संघटनच्या शिक्षकांनी बुधवारी पंचायत समिती कार्यालयासमोर ‘आंबील खाओ आंदोलन’ केले.
मार्च २०१६ ची सादर वेतनदेयके प्रथम डीसीपीएसच्या आॅनलाईन कपातीबाबत व नंतर आर्थिक आकडेवारी चुकीची जनरेट झाल्याची कारणे देत वारंवार रद्द केली जात आहे. प्रशासनाच्या तांत्रिक दिरंगाईमुळे मार्च २०१६ च्या वेतनास कमालीचा विलंब होत आहे. संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षक, कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहे. डीसीपीएसच्या दोन हप्त्यांची कपात करू नये, या मागणीचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून आर्थिक भुर्दंड न लादता पूर्वीच्या नियमीत मासिक वेतनासारखेच मार्च २०१६ चे वेतन सत्वर करणे गरजेचे होते; पण डीसीपीएस कपातीवर जि.प. प्रशासन अधिक लक्ष केंद्रीत करीत आहे. यामुळे गोंधळ निर्माण झाला असून सर्वच शिक्षकांच्या वेतनास विलंब होत आहे.

Web Title: Zip Teachers 'Aambil Khao Movement'