शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा होणारा अपव्यय टळणार

By admin | Updated: May 7, 2017 00:44 IST

स्थानिक ग्रा.पं. प्रशासनाच्यावतीने नळावर मिटर बसविण्याच्या कामाला वेग दिल्या जात असल्याने होणारा पाण्याचा अपव्यय टळणार आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाकडून नळावर मीटर लोकमत न्यूज नेटवर्क सेवाग्राम : स्थानिक ग्रा.पं. प्रशासनाच्यावतीने नळावर मिटर बसविण्याच्या कामाला वेग दिल्या जात असल्याने होणारा पाण्याचा अपव्यय टळणार आहे. तसेच पाण्याच्या अतिवापरावर चाप बसणार आहे. नगर वासियांना नवीन नळ कनेक्शन देण्यात येणार असून होणारा पाण्याचा अपव्यय टळणार असल्याने उन्हाळ्यातील पाणी समस्येवर ग्रा.पं.प्रशासनाचे हे पाऊल रामबाण इलाज ठरणार असल्याचे सांगण्यात आले. ग्रा.पं. प्रशासनाने १४ व्या वित्त आयोग निधीतून नळावर मिटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. याची सर्व प्रथम अमलबजावणी आदर्शनगर मध्ये करण्यात आलेली आहे. २४७ मिटर बसविले आहे. काही लोकांनी विरोध दर्शविला. पण, लवकरच सर्वांना समान व आवश्यक पाणी मिळेल. काटकसरीने पाणी वापर व्हावा यासाठी मिटर लावण्यात येणार आहे असे ग्रा.पं. प्रशासनाच्यावतीने नागरिकांना सांगण्यात आले. ग्रामस्थांना मुबलग पाणी द्या अशी मागणी जुनीच होती. परंतु, विविध कारणांमुळे नगरवासीयांची उपेक्षा पुर्ण होत नव्हती. आदर्श नगरला नेहमीच झुलते माप देण्यात आल्याचाही आरोप होत होता. परंतु, यंदा आदर्शनगरला प्राधान्य देण्यात आले आहे. प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंततर्गत पाणी देण्यात आले आहे. घरगुती नळ कनेक्शन देण्यात यावे, अशी मागणी रहिवासीयांची आहे. डिमांड भरण्याची तयारीही नागरिकांची आहे. सध्या तरी आदर्श व सेवाभावी नगरवांसीयांचा पाण्याचा प्रश्न सुटला असून दोन्ही नगरात बाराही महिने पाणी मिळणार का असा सवाल विचारला जात आहे. जुनी वस्ती व ऊगले ले-आऊट या भागाला जुन्या वस्तीतील जलकुंभातून पाणी पुरवठा केला जातो. उन्हाळ्याचे दिवस असल्याने विहीरींची पाणी पातळी दिवसेंदिवस खाली जात असून नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.